नोटा उधळून केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल, बीडीओ निलंबित

1002 0

शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी लाच मागतात. या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा येथील अपक्ष सरपंच मंगेश साबळे यांनी नोटा उधळून आंदोलन केले. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

गिरीश महाजन यांनी केलेल्या कारवाईचं सरपंच मंगेश साबळे यांनी स्वागत केलंय. तसेच, मी उधळलेले पैसेही त्या महिला अधिकाऱ्यांकडून वसुल करुन, मला परत करावेत, अशी मागणीही आपण संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचं साबळे यांनी म्हटलंय. कारण, मी उधळलेला पैसा हा शेतकऱ्यांचा आहे, त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा आहे, असंही ते म्हणाले.

गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी शासकीय योजनेतील विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १२ टक्के लाचेची मागणी केल्याच्या आरोप करत फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी त्यांनी नोटा उधळून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. गळ्यात शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल अडकवून गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने संताप व्यक्त करीत आंदोलन केले. या सरपंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

सरपंच मंगेश साबळे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावात विहिरीचे २० प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के रक्कम मागत आहेत. म्हणून शुक्रवारी २ लाख रुपये घेऊन आलो; पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्यामुळे या नोटा उधळल्या. दरम्यान, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी सरपंच साबळे यांच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन ?

‘मी 20 वर्षे झाले आमदार आहे, मी 20 वर्षे विरोधातही होतो. त्यावेळी आणि आताही मी राज्यभरात पाहतोय की अनेक ठिकाणच्या मागणीच्या गोष्टी पुढे येत आहेत. पैसे मागितले जात आहेत. जास्त लोकांची मागणी आल्यावर तुझा नंबर आधी लावतो, याचा नंबर लावतो या गोष्टी होत आहेत. त्यामुळे या संदर्भात आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलणार आहोत. जे निदर्शनास येईल त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रथमदर्शनी बीडीओंना निलंबित केलं आहे. या संदर्भात चौकशी लावलेली आहे’

Share This News

Related Post

Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्याप्रकरणात मुलगी मानसी देसाईने केले खळबळजनक आरोप

Posted by - August 5, 2023 0
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्टला एनडी स्टूडिओत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 5 …
Nilesh Lanke and ajit pawar

Nilesh Lanke : आपल्याला निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचाय; अजित पवारांनी भरसभेत दिला इशारा

Posted by - May 10, 2024 0
अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित…

Abdul Sattar : सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’ भाजप नेत्याने केली मागणी

Posted by - June 14, 2024 0
सिल्लोड : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *