अस्सल गावरान पद्धतीने बनवा ‘वांग्याचे भरीत’…! सोपी रेसिपी

319 0

गृहिणींना रोज सतावणारा प्रश्न म्हणजे आज भाजी काय बनवू रोज रोज त्याच प्रकारच्या ठराविक भाज्या खाऊन देखील कंटाळा येऊन जातो. मग आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने वांग्याचे भरीत कसे बनवायचे हे सांगणार आहे चला तर मग पाहूया साहित्य…

वांग्याचे भरीत बनवण्यासाठी अर्थात आपल्याला लागणार आहे भरताच काळ वांग, हिरव्या मिरच्या,कडीपत्ता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ,लिंबू, मीठ

कृती : सर्वात प्रथम भारताचे वांगे चांगले भाजून घ्या. भाजताना या वांग्याला चार बाजूनी काप द्या आणि या प्रत्येक कापामध्ये एक हिरवी मिरची खोचून ठेवा . तोपर्यंत एक मोठा कांदा एक टोमॅटो, हिरव्या मिरच्या कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे.

See the source image

एका कढईमध्ये तळणीसाठी तेल घेऊन यास जिरे मोहरीची फोडणी द्यावी. तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग चिमूटभर आणि हळद एक छोटा चमचा घालावी. फोडणीमध्ये कढीपत्ता, मिरची घालून दहा सेकंद परतावे त्यानंतर यामध्ये कांदा, टोमॅटो घालून एकसारखे परतून घ्यावे.

कांदा आणि टोमॅटो मध्यम आचेवर परतून घेईपर्यंत एका बाजूला चांगले भाजून घेतलेले वांगे घेऊन देठ कापून बाजूला करा. भाजून निघालेले वरचे साल काढून घ्या. या वांग्यास आता पूर्णपणे स्मॅश करा. त्यानंतर स्मॅश केलेले वांगे कांदा-टोमॅटोमध्ये घालून एकसारखे परतून घ्या. अगदी 25-30 सेकंद परतल्यानंतर देखील भाजीचा सुगंध घरात पसरू लागेल.

वांगे भाजलेले असल्यामुळे जास्त वेळ परतण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर झाकण ठेवून केवळ 20 ते 30 सेकंद चांगली वाफ दबू द्या. त्यानंतर भाजीमध्ये मीठ घालून एकदा परतून घ्यायचे आहे. यावर आता लिंबू पिळून चिरलेली कोथिंबीर भुरभुरून टाका. तयार आहे टेस्टी भरताचे वांगे…

Share This News

Related Post

#PUNE : पुण्यातील चांदणी चौकाचे 1 मे ला होणार लोकार्पण !

Posted by - March 13, 2023 0
पुणे : 2 ऑक्टोबर या दिवशी चांदणी चौकातील पूल ब्लास्ट करून पाडण्यात आला होता. या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून पुणेकरांनी प्रचंड…

कोथरूड नाट्य परिषदेच्या वतीने ५ डिसेंबर रोजी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन

Posted by - December 1, 2022 0
पुणे : अ.भा. मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा व आम्ही कोथरुडकर यांच्या वतीने सोमवार दिनांक ५ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता…

Deputy CM Manish Sisodia : उपमुख्यमंत्र्यांसह 13 जणांविरोधात लुकाऊट नोटीस जरी ; देश सोडण्यास मनाई

Posted by - August 21, 2022 0
दिल्ली : दिल्लीच्या नव्या एक्साईज धोरणाच्या संदर्भात CBI ने शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा टाकला . आज उपमुख्यमंत्री…

कुख्यात गुंड गजा मारणे ची नागपूर कारागृहातून सुटका

Posted by - March 7, 2022 0
नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे ची कारागृहातून सुटका झाली आहे.गजा मारणेला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्ष स्थानबद्ध…

‘अतिक आणि त्याच्या गुंडांनाही असंच मरण येईल….’ ‘या’ महिलेची शापवाणी खरी ठरली

Posted by - April 17, 2023 0
अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असंच मरण येईल, जसं माझ्या पतीला आलं. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *