महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक – 2023 विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीच्या प्राथमिक मतदार याद्या जाहिर

245 0

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण व अभ्यासमंडळावरील सदस्य निवडीकरीता निवडणूकीच्या अनुषंगाने ‘प्राथमिक मतदार’ याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्यानुसार विद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यासमंडळावरील सदस्य यांच्या निवडीकरीता प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते.

त्याव्दारा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील मान्यताप्राप्त शिक्षकांतून विद्यापीठ प्राधिकरण सदस्यांची निवडणूक प्रक्रियेव्दारे निवड करण्यात येते. यासाठी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने प्राथमिक मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. सदर मतदार याद्या विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाकडून प्रसिध्द प्राथमिक मतदार यादीतील हरकती असल्यास दि. 03 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यापीठाकडे ई-मेलव्दारा अथवा विद्यापीठाचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व लातूर येथील विभागीय केंद्रात लेखी स्वरुपात पुराव्याचे कागदपत्रांसह नोंदवू शकतात. याबाबत अधिक माहिती व सूचना विद्यापीठाचे निदेश क्र. 10/2017 मध्ये नमुद करण्यात आले आहेत. विहित वेळेत प्राप्त हरकतींवर मा. कुलगुरु यांचे समक्ष सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीचा निर्णय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यसात येईल. मा. कुलगुरु यांनी घेतलेला निर्णय अंतीम व बंधनकारक राहिल.

विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक वेळापत्रक व अंतीम मतदार याद्या मा. कुलगुरु महोदया यांच्या सुनवणीनंतर स्वतंत्र्यरित्या जाहिर करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठ निवडणूक कक्षास 0253-2539151 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Share This News

Related Post

हीच का महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ?

Posted by - April 1, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचा स्तर ढासळत चालला असून जनहिताच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक हेवेदावे यांनाचं सत्ताधारी विरोधक जास्त प्राधान्य देत असल्याचं…
MLA Disqualification

MLA Disqualification : शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत ‘या’ दिवशी होणार अंतिम फैसला

Posted by - September 22, 2023 0
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यत्र राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification) कारवाईला वेग देण्याचा निर्णय…

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला का झाली अटक ? जाणून घ्या प्रकरण

Posted by - February 28, 2022 0
मुंबई- भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. कांबळी याने दारुच्या नशेत गाडी चालवत दुसऱ्या…

VIRAL Video : महिलेला अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करणे पडले महागात ; श्रीकांत त्यागी गजाआड

Posted by - August 9, 2022 0
Shrikant Tyachi Case : काही दिवसांपूर्वी श्रीकांत त्यागी याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बेकायदेशीर बांधकामावरून एक महिला श्रीकांत त्यागी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *