MAHARASHTRA POLITICS : सत्ता संघर्षाचे प्रकरण आता घटनापिठाकडे ; 25 ऑगस्टला होणार पहिली सुनावणी

206 0

MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद आता पाच सदस्यीय घटना पिठाकडे वर्ग करण्यात आला आहे . त्यामुळे या सत्ता संघर्षाचा आता नवीन अंक गुरुवारपासून सुरू होत आहे. दरम्यान कोर्टाच्या घटना पिठाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्ष चिन्ह यांसंदर्भात कोणताही निर्णय देऊ नये असे आदेश दिले आहेत . त्यामुळे घटनापिठाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणावर काल सुनावणी होती. काल ही सुनावणी झाली नव्हती. कोर्टाच्या आजच्या लिस्टमध्येही या प्रकरणाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अनिल परब यांनी कोर्टात मेन्शन याचिका दाखल करून या प्रकरणावर लवकर सुनावणी करण्याची मागणी केली . त्यानुसार कोर्टाने आज सुनावणी घेतली. मात्र, थोड्या युक्तिवादानंतर कोर्टाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवत असल्याचं स्पष्ट केलं.

या घटनापीठासमोर 25 ऑगस्ट रोजी पहिली सुनावणी होणार आहे. घटनापीठासमोर या प्रकरणाशी संबंधित 5 याचिकांवर सुनावणी होणार असून घटनापीठाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरन्यायाधीश एसव्ही रमण्णा हे सुद्धा या घटनापीठात असण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्ट रोजी रमण्णा हे निवृत्त होत असल्याने 25 ऑगस्ट रोजी या प्रकरणावर निर्णय येणार की या प्रकरणाचा निर्णय लांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This News

Related Post

डेंगी, चिकनगुनिया सारखे आजार थोपवण्यासाठी उपाययोजना करा ; सुनील माने यांचे सहआयुक्तांना निवेदन

Posted by - September 20, 2022 0
पुणे : औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे…

#HEALTH WEALTH : मुलांनाही होऊ शकतात हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Posted by - March 9, 2023 0
आजच्या युगात मुलांना काही गंभीर आजार होऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वी हृदयाशी संबंधित आजार प्रामुख्याने वयोवृद्ध आणि वृद्धांमध्ये दिसून येत…

राणा दांपत्याच्या जामीनअर्जावर उद्या दुपारी 2.45 वाजता सुनावणी

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दांपत्याच्या जामिन याचिकेवर उद्या दुपारी पावणे तीन…
pune

Pune News: नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथीयांचे आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

Posted by - July 12, 2023 0
पुणे : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर…

सभा भव्य दिव्य होणार, पोलीस केसेस अंगावर घेण्यास आम्ही तयार- अमित ठाकरे

Posted by - April 30, 2022 0
औरंगाबाद- मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *