MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत दाखल सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी 13 जानेवारीला

162 0

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील दाखल सर्व याचिकांवर येत्या 13 जानेवारीला एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज ही माहिती दिली. महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे स्थापन झालेल्या ईडी सरकारच्या वैधतेला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासह बंडखोर आमदारांची अपात्रता आणि सत्ता संघर्षावेळी निर्माण झालेल्या वादंगावर दाखल सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटना पिठापुढे सुनावणी सुरू असून सरन्यायाधीशांनी पुढील सुनावणीसाठी पुढच्या वर्षी अर्थात 13 जानेवारीला तारीख दिली आहे.

घटना पिठातील एक न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांची तब्येत बिघडल्याने 29 नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी होऊ शकली नाही. तसेच पुढील आठवडा कामकाजाच्या दृष्टीने व्यस्ततेचा असल्याकारणाने घटना पिठापुढे सुनावणी घेणे शक्य नसल्याचे कारण देऊन सरन्यायाधीशांनी या सर्व दाखल याचिकांवर 13 जानेवारीला एकत्रित सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 13 जानेवारीला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम.आर शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती पी. नरसिंह यांच्या घटना पिठापुढेही सुनावणी होणार आहे.

Share This News

Related Post

शाहरुख खान याच्या डिग्रीचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात…… ‘ज्याची डिग्री खरी … ‘

Posted by - April 5, 2023 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री मागितल्याचा कारणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने दंड ठोठावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा…
Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - December 1, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आजच्या कर्जतमधील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.…

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! पुण्यात रंगणार भारत-श्रीलंका ट्वेन्टी 20 सामना

Posted by - December 27, 2022 0
पुणे : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुढील वर्षी 5 जानेवारीला गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर…

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी तरुणाई सरसावली

Posted by - March 16, 2024 0
  पुणे दि.१५- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी मतदार जागृती उपक्रमात जिल्ह्यातील तरुणाई पुढे आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या…

” घरात जेवढी बायको फुगत नसते , तेवढे मंत्री फुगतात …! ” नाराज मंत्र्यांवर सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी …

Posted by - August 16, 2022 0
पुणे : सर्वात आधी घडलं ते एकनाथ शिंदे यांचं बंड नाट्य … त्यानंतर सत्ता स्थापनेचा पेच सुटतो न सुटतो तोच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *