महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : “तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता ?” दीपक केसरकर यांचा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल

236 0

कोल्हापूर : कर्नाटक सरकारने नुकतेच महाराष्ट्राला पत्र पाठवून बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पाऊल ठेवून नये असा धमकी वजा इशारा दिला आहे. एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चाललेला असताना “अद्याप देखील महाराष्ट्राने सामोपचाराची भूमिका घेतली आहे. त्यांनी अविचाराने निर्णय घेतला तर तसाच आपणही घेणे हे योग्य नाही. सामोपचाराने प्रश्न सुटले पाहिजेत अशी आमची इच्छा असल्याचं केसरकर म्हणाले आहेत. तथापि तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता? महाराष्ट्रात आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबईत आणि राज्यात येण्यास बंदी करू शकतो पण तसे आम्ही करणार नाही. अशी परखड भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली आहे.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना दीपक केसरकर म्हणाले की, “कोणत्याही धरणाचे पाणी सोडले की प्रश्न सुटत नाहीत. पाणी योजनेसाठी दोन हजार कोटी महाराष्ट्रन दिले आहेत. कर्नाटक कडून सीमा भागातील नागरिकांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कर्नाटक त्यांच्या लोकांना बहुभाषा सुविधा देखील देऊ शकले नाहीत. न्यायालयाचा निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल हा आमचा विश्वास आहे. तुमच्याकडे रस्ते दुरुस्त करायला पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करतात असा थेट हल्लाबोल दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारवर केला आहे.

Share This News

Related Post

‘खोका’ उल्लेख करणाऱ्याला अटक करून खोक्याचे समर्थनच- अजित पवार

Posted by - April 8, 2023 0
खोके यावरून रॅप साँग करणाऱ्याला जेलमध्ये टाकले. त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एक प्रकारे समर्थन केले आहे अशी टीका विरोधी…

शिंदे गट आज पुन्हा गुवाहाटीत; कामाख्या देवीचा घेणार दर्शन

Posted by - November 26, 2022 0
आसाम: राज्यातील सत्तांतराच्या वेळी केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान शिंदे गटासाठी काही वेगळंच आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला सत्तेच्या राजगादीवरुन खाली आणून…

… तर आम्ही सत्तेतून बाहेर पडणार; आमदार संजय शिरसाट यांचं मोठं विधान

Posted by - April 18, 2023 0
अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे याच पार्श्वभूमीवर संजय…

BREAKING NEWS : चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनरची 3 रिक्षांना जबरदस्त धडक ; 1 ठार ३ गंभीर जखमी

Posted by - September 29, 2022 0
पुणे : पुण्यातील हडपसर मध्ये गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला . या अपघातामध्ये एक जण मृत्युमुखी पडला असून तीन जण…

जुहूच्या घरात १०० टक्के कायदेशीर बांधकाम, नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

Posted by - February 19, 2022 0
मुंबई- जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *