महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तोंड गप्प असल्यामुळं बोम्मई जास्त बोलत आहेत…!” संजय राऊतांचा हल्लाबोल

291 0

नवी दिल्ली : राज्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापुरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी आग लावण्याचं काम करत असल्याचे राऊत म्हणाले आहेत. दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं हे बोम्मई मानायला तयार नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तोंड गप्प असल्यामुळं बोम्मई जास्त बोलत असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेनं बोम्मई यांच्या विरोधात ठराव करुन तो मंजूर केला पाहिजे असे मत संजय राऊत यांनी मांडल आहे. संजय राऊत चीनचे एजंट असल्याचे वक्तव्य बोम्मई यांनी केलं होतं. आज संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधाला.

यावेळी संजय राऊत म्हणाले कि, “आम्हाला कर्नाटकची जमीन नकोच आहे. आमच्या हक्काच्या बेळगावसह जी गावं आमची आहेत त्यावर आमचा दावा आहे. हा आमचा दावा कायदेशीर असल्याचे राऊत म्हणाले. आमची कायद्याची भाषा आहे तर बोम्मईंची फायद्याची भाषा असल्याचे राऊत म्हणाले. या सर्व विषयावर महाराष्ट्रातील सरकार तोंड बंद करुन गप्प आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.” असे संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

बंडानंतर एकनाथ शिंदे यांची आली पहिली प्रतिक्रिया, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत

Posted by - June 21, 2022 0
मुंबई -एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली…

चौदा वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाला धूळ चारत कोरलं थॉमस करंडकावर नाव

Posted by - May 15, 2022 0
जगातील नामवंत बॅडमिंटन स्पर्धा पैकी एक मानल्या जाणाऱ्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य ठरला आहे. या स्पर्धेची अंतिम…
Buldhana News

Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी

Posted by - January 5, 2024 0
बुलढाणा : सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत (Buldhana News) सापडला आहे. कारण सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाल्याचं चित्र पाहायला…

प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Posted by - June 2, 2022 0
पिंपरी – प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून आज गुरुवारी (दि. 2) डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्‍टरांनी काही…

चित्रा वाघ यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 13, 2022 0
पुणे- भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. चित्रा वाघ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *