महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा; ईडीच्या आरोपपत्रात अजित पवारांचं नावच नाही

466 0

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) एक आरोपपत्र दाखल केले आहे. या घोटाळ्यात एका कंपनीचेही नाव होते. ही कंपनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे. मात्र आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नाव नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवारांना ईडीकडून क्लीन चिट मिळाली की काय अशी चर्चा आहे.

जुलै 2021 मध्ये ईडीने या प्रकरणात 2010 मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची एकूण 65 कोटी रुपयांची जमीन, इमारत आणि साहित्य यासह मालमत्ता जप्त केल्या होत्या. ईडीने त्या वेळी हे स्पष्ट केले होते की, ही संपत्ती सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिसेसच्या नावावर आहे आणि जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला लीजवर आहे. या कारखान्याचा लिलाव कमी किंमतीत झाल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे.

या घोटाळ्यात स्पार्कलिंग सॉइल लिमिटेड या कंपनीचं नाव आलं होतं. जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​बहुतांश शेअर्स स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे आहेत. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. पण ईडीने या प्रकरणी अजित पवार यांची एकदाही चौकशी केली नाही. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना साधं समन्सही बजावलं नाही. आता ईडीने स्पार्कलिंग सॉइल कंपनीला आरोपी बनवलं आहे. या कंपनीविरोधात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. पण अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा या आरोपपत्रात साधा उल्लेखही नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. न्यायालयाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतली नसून पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे.

Share This News

Related Post

Sharad Pawar and Ajit Pawar

Sharad Pawar : ‘अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते’ वक्तव्यावरुन शरद पवारांचा यु – टर्न; आता म्हणतात…

Posted by - August 25, 2023 0
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सकाळी केलेल्या एका वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली…
Kolhapur News

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; उसाचा ट्रॅक्टर पेटवला

Posted by - November 18, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या उसाचे दर वाढून मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघनेच्या…

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला ; राज्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा

Posted by - July 19, 2022 0
नागपूर- एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. राष्ट्रपतीपदाच्या मतदानानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे 12…

बनावट नोटा छापून चलनात आणणारी टोळी गजाआड, इस्लामपूर पोलिसांची मोठी कारवाई

Posted by - June 1, 2022 0
इस्लामपूर – आयसीआयसीआय बँकेच्या इस्लामपूर येथील शाखेतील पैसे भरण्याच्या डिपॉझिट मशीनमध्ये तीन हजारांच्या बनावट नोटा भरून त्या वापरात आणण्याऱ्या टोळीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *