महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

952 0

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली.

14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

Share This News

Related Post

#VIRAL VIDEO : सेल्फी घेण्यासाठी ठाकरे गटाच्या आमदार पुत्राची सोनू निगमला धक्काबुक्की; गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Posted by - February 21, 2023 0
चेंबूर : सोमवारी चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या वतीने एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिवलमध्ये गायक…
Solapur News

Sharad Pawar : ‘साहेब आम्हाला न्याय द्या’ शाळेच्या रस्त्यासाठी चिमुकल्यांनी शरद पवारांना दिले निवेदन

Posted by - November 17, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये शाळेला जाण्यासाठी रस्ता करून मिळावा या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे…

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का साजरा करतात मैत्री दिन ?

Posted by - August 7, 2022 0
आज ऑगस्ट महिन्याच्या पहिला रविवार फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का फ्रेंडशिप डे का साजरा करतात असा प्रश्न तुम्हालाही…

पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून आढळली तब्बल चार कोटी रुपयांची रोकड (व्हिडिओ)

Posted by - March 30, 2022 0
लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून तब्बल चार कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली. याप्रकरणी सांगलीच्या दोघांना ताब्यात घेतले…

अतिवृष्टीतील मदत कार्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क,यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

Posted by - July 5, 2022 0
मुंबई: राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *