घरगुती गॅस पुन्हा महागला, एलपीजी सिलेंडर आता मिळणार ‘या’ किमतीला

367 0

नवी दिल्ली- महागाईने देशात उच्चांक गाठला असून त्यामध्ये आता घरगुती गॅसच्या दरवाढीने भर पडली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडर 3 रुपये 50 पैशांनी तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 8 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती एक हजार रुपयांच्या वर पोहोचल्या आहेत.

दिल्ली आणि मुंबईमध्ये 14.2 किलोंचा घरगुती एलपीजी सिलेंडर 1003 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1003 रुपयांवर गेला आहे. आज, एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांवर पोहोचली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. घरगुती सिलेंडरच्या दरांत केवळ 12 दिवसांत झालेली ही दुसऱ्यांदा दरवाढ आहे. यापूर्वी 7 मे 2022 रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली होती.

देशातील प्रमुख शहरांतील घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर (14.2 किलोग्राम)

मुंबई                 1002.50 रुपये प्रति सिलेंडर
दिल्ली               1003 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता         1029 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई                1018.50 रुपये प्रति सिलेंडर

देशातील प्रमुख शहरांतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर

मुंबई             2306 रुपये प्रति सिलेंडर
दिल्ली           2354 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता     2454 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई            2507 रुपये प्रति सिलेंडर

Share This News

Related Post

Mohit Pandey

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Posted by - January 22, 2024 0
अयोध्या : 22 जानेवारीला रामललालाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा (Mohit Pandey) करण्यात येणार आहे. संपूर्ण देश दिवाळी उत्सव करणार आहे. संपूर्ण…

#Accident : अपघात ग्रस्त दुचाकी स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरून पळ काढणारा ट्रकचालक गजाआड

Posted by - February 6, 2023 0
पिंपरी : अज्ञात ट्रकचालकाने जबर धडक देऊन पृथ्वीराज शेळके (वय वर्षे 22) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर ट्रक…
Top News Marathi Logo

वाईन बाबतचा निर्णय राज्याला कुठं घेऊन जाणार ? अण्णा हजारे यांचा सवाल

Posted by - January 31, 2022 0
केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी…

मोठी बातमी! माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार

Posted by - June 13, 2022 0
मुंबई- माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला…

कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर पुन्हा दगडफेक; परिसरातील वातावरण तापले

Posted by - December 22, 2022 0
कर्नाटक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात सीमा भागातील मराठी भाषकांवर कन्नडगांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *