घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ, आता मोजावे लागणार 1 हजार रुपये

408 0

नवी दिल्ली- सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता घरगुती सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना तब्बल एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एलपीजी गॅसची किंमत वाढल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढणार आणि गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत होता. त्यात आता भर म्हणून एलपीजी गॅस सिलेंडरचे दर देखील वाढले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य जनता आणखी त्रस्त झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder Price) दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता प्रति सिलेंडर 999.50 रुपये असेल. आजपासून एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असतानाच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत.

याआधी 22 मार्च रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतर दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा महागाईने जनता होरपळली आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढल्यानंतर घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली आहे.

Share This News

Related Post

राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची टीका

Posted by - April 20, 2022 0
सांगली- राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु…

उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

Posted by - October 22, 2022 0
मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून…

पोलीसच देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चौकशीसाठी जाणार, गृहमंत्रालयाचा निर्णय

Posted by - March 12, 2022 0
मुंबई – कथित पोलीस बदली घोटाळा प्रकरणी आता मुंबई पोलिसच फडणवीस यांच्या घरी चौकशीसाठी जाणार आहेत. राज्याच्या गृहमंत्रालयाने याबाबत तसा…

CRIME NEWS : तंबाखूच्या व्यसनापायी आईचीच केली निघृण हत्या; आरोपी मुलगा…

Posted by - November 16, 2022 0
पुणे (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलांनाच आपल्या जन्मदात्रीच्या डोक्यात…

मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका; इन्स्टा पोस्ट करून म्हणाली, ‘माझं हृदय…!’

Posted by - March 2, 2023 0
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर एन्जिओप्लास्टी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *