Deputy CM Manish Sisodia : उपमुख्यमंत्र्यांसह 13 जणांविरोधात लुकाऊट नोटीस जरी ; देश सोडण्यास मनाई

328 0

दिल्ली : दिल्लीच्या नव्या एक्साईज धोरणाच्या संदर्भात CBI ने शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा टाकला . आज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 13 जणांच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे . या सर्वांना आता देश सोडण्यास मनाई करण्यात आली असून , त्यांना केव्हाही अटक करण्यात येऊ शकते .

सविस्तर माहितीनुसार , दिल्लीच्या नव्या एक्साइज धोरणाच्या चौकशी प्रकरणी CBI ने शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा टाकला . केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 14 तास चौकशी केल्यानंतर त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉप देखील जप्त केला आहे. त्यासह काही महत्त्वाचे कागदपत्र देखील जप्त करण्यात आले असल्याचे समजते. त्यांच्या विरोधात रविवारी लुकाऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

मनीषा सिसोदिया यांच्या विरोधात भादवि कलम 120 B , 477 A आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान भादवि कलम 20 B आणि PC कायदा कलम 7 नुसार या प्रकरणांमध्ये ED देखील चौकशी करू शकते . त्यामुळे या सर्वांवर आता अटकेची कारवाई देखील होऊ शकते.

Share This News

Related Post

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन

Posted by - December 22, 2022 0
नागपूर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं असून नागपूर अधिवेशनापर्यंत जयंत पाटील निलंबित करण्यात आलं आहे. अध्यक्षांबाबत अपशब्द…

धक्कादायक! पुण्यात ट्रॅव्हल चालकाकडून 21 वर्षीय महिलेचं अपहरण करून बलात्कार

Posted by - June 13, 2022 0
पुणे- बाहेरगावावरून पतीसोबत कामाच्या शोधासाठी पुण्यात आलेल्या एका महिलेवर दोन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या…

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न

Posted by - October 11, 2022 0
मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Ajit Pawar

NCP : राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी अजित पवारांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP) आज मोठी फूट पडली आहे. आज…

धक्कादायक : पवना धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू

Posted by - January 8, 2023 0
मावळ : मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *