” निकालाकडे पाहताना फारसा उत्साह वाटत नाही, ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे… ” अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया

316 0

चिंचवड : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणी प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचे दिसून येते आहे.

#Latest Updates : चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप गड राखणार ? वाचा आतापर्यंतचा निकाल

दरम्यान या निकालाविषयी माध्यमांशी बोलताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे निकालाकडे बघताना फारसा उत्साह वाटत नाही. मला आज साहेबांची खुप आठवण येत आहे. निकालाकडे बघताना तसा फार उत्साह नाही, पण लोकांना न्याय द्यावा, त्यांच्या पाठीवर हात फिरवणारे कुणी असावे, त्यांची कामे वेळच्यावेळी व्हावीत, त्यांना भक्कम आधार देणारे कुणीतरी असावे यासाठी खरेतर मी निवडणुकीसाठी उभी राहिले.

ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे. भाजपाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इथे येऊन मला पाठिंबा दिला, सभा घेतल्या. भाजपाचे भारतातून कार्यकर्ते आले होते. त्यांना मी धन्यवाद देईन.असे त्या म्हणाल्या.

#Latest Updates : कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात वाचा , अत्यंत चुरशीची लढत , आतापर्यंत काय झाले ?

“ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी फॉर्म भरल्यामुळे आमच्या सगळ्यांवर भार पडायला लागला. बिनविरोध झाली असती निवडणूक तर चांगलं झालं असतं”, असेही यावेळी अश्विनी जगताप म्हणाल्या आहेत.

Share This News

Related Post

Breaking News ! टाटा स्टील कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन कर्मचारी जखमी

Posted by - May 7, 2022 0
जमशेदपूर- झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टील कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर प्लांटमध्ये भीषण आग लागली. या आगीत दोन…

आनंदाची बातमी ! नीट परीक्षेची तारीख पुढे ढकलली, तारीख कोणती ते जाणून घ्या

Posted by - May 16, 2022 0
नवी दिल्ली- देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET UG 2022) नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आलेली…

मनाची अंघोळ : जेव्हा कोणत्याही कारणाने मनस्थिती खराब होते…! मनस्ताप दूर ठेवण्यासाठी सिम्पल टिप्स

Posted by - August 25, 2022 0
आयुष्यामध्ये असे बऱ्याच वेळा घडते की , एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे विनाकारण आपलाच मनस्ताप होतो. तर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे प्रचंड संताप…

पर्वती जनता वसाहतीमध्ये टोळक्याचा धुडगूस, कोयते नाचवत १२ हुन अधिक वाहनांची तोडफोड

Posted by - June 9, 2022 0
पुणे- स्वारगेटजवळ बुलेट गाडी फोडल्याच्या रागामधून निल्या वाडकर टोळीमधील गुंडांनी पर्वती पायथ्याला असलेल्या जनता वसाहतीमध्ये राडा करत १२ पेक्षा अधिक…

#CRIME NEWS : जन्मदात्रीनेच घेतला दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव; म्हणाली, “मला संभाळणं असह्य झालं होतं, चिडचिड व्हायची…!”

Posted by - February 14, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये 6 फेब्रुवारीला एक धक्कादायक घटना घडली होती. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन चिमुकले बेशुद्ध झाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *