चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ; कसबातून कोणाला मिळणार उमेदवारी ?

1131 0

चिंचवड : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन मतदारसंघात 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होते आहे. दरम्यान भाजपकडून या दोन्ही जागांवर टिळक आणि जगताप यांच्या परिवारातूनच कुणाला तरी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, विधानसभा पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यास चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकते असे देखील जाणकारांचे मत आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी घरातील एकाला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्यांचा निर्णय अंतिम असेल, असंही ते म्हणाले आहेत. तसेच महापालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर, खासदार गिरीश बापट यांच्या सुन स्वरदा बापट, नगरसेवक धीरज घाटे असे अनेकजण या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

Share This News

Related Post

एसटी कर्मचारी आक्रमक ! शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन

Posted by - April 8, 2022 0
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईतील शरद पवार यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले आहे. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात…

राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचे अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण ?

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यासाठी आघाडी सरकारला ४ मे रोजीचा…

TOP NEWS INFO : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ चे गीतकार राजा बढे यांचा जीवनप्रवास…VIDEO

Posted by - October 20, 2022 0
TOP NEWS INFO : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला जाणार आहे. ज्येष्ठ…

Municipal elections : अखेर 4 सदस्यांचाचं प्रभाग निश्चित ; 2017 प्रमाणे होणार निवडणूक (VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
Municipal elections : पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील तब्बल 18 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत . या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आता 2017 नुसारच…

#ACCIDENT : रात्रीच्या जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडला; त्यानंतर तरुण घरी परतलाच नाही, कुटुंबावर शोककळा , नक्की काय घडले ?

Posted by - February 7, 2023 0
जळगाव : जळगाव मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. जळगाव मधील समता नगर या ठिकाणी राहणारा तरुण रमेश नाडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *