लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्यावर बंदी घालण्यात यावी ; प्रशांत सदामते यांची मागणी

258 0

लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्या अश्लिल कार्यक्रमुळे महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी आणि मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटील वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन हि दिले आहे.

गौतमी पाटील महाराष्ट्रातील लावणी परपरेला व संस्कृतीला छेद देत अश्लिल नृत्य सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमादरम्यान सादर करत असते, तिचे अश्लिल हावभवाचे व्हिडिओ छोटया व्हिडिओ अॅप व्दारे घराघरात पोहोचतात. घरामध्ये माता भगिणी व लहान मुले मुली याच्यासमोर असे व्हिडिओ नजरचुकीने समोर येतात. नुकतीच गेल्या महिन्यात मिरज तालुक्यातील बेडग येथे कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो पब्लिक शाळेच्या छतावर झाडावरती, बसून पहात होते तसेच धिंगाणा करत होते.

यावेळी दत्तात्रय ओमासे याचा मृतदेह त्याठिकाणी आढळला, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्या आली. परंतू घटनेची सखोल चौकशी करण्यात येवून दत्तात्रय ओमासे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तन करुन नृत्य करुन प्रत्येक कार्यक्रमात पब्लिक कडून गोंधळ निर्माण होतो.

त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. चार दिवसांपूर्वी बीड मध्ये ट्रॅफीकची समस्या निर्माण होवून कार्यक्रमादरम्यान दगडफेकसुद्धा झाली होती. त्यामुळे अश्लिल नृत्य सादर करणारी गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे.

Share This News

Related Post

Raj Thackeray

Mumbai News : 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश

Posted by - September 26, 2023 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश ( Marathi Shop Signboards) दिले आहेत. प्रकरण उच्च…
BARTI

BARTI : बार्टी पीएचडी संशोधक विद्यार्थी (2018) तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Posted by - January 17, 2024 0
पुणे : BANRF-2018 अधिछात्रवृत्ति पीएचडी संशोधक विदयार्थी कृति समिती यांच्या मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे यांच्याकडे…

इंजिनिअर असलेल्या उच्च शिक्षित दांपत्याचा ९ दिवसात घटस्फोट

Posted by - April 30, 2022 0
पुणे- स्वभाव जुळत नसल्याने एकमेकांपासून दीड वर्ष वेगळे राहणाऱ्या दांपत्याला केवळ ९ दिवसात घटस्फोट मिळाला. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास…

मराठा आरक्षणाचा पुन्हा एल्गार ! मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघाच्या बैठकीत एकमतानं निर्णय… पाहा

Posted by - September 15, 2022 0
सोलापूर : मराठा आरक्षणाचा पुन्हा एकदा एल्गार होणार असल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा मोर्चा, संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा…

दारूनं घेतला जिवाचा घोट ! पाचव्या मजल्यावरून उतरताना तोल गेला अन् जिवाला मुकला… व्हिडिओ पाहा…

Posted by - September 1, 2022 0
पिंपरी चिंचवड : दारूची नशा कशी जीवघेणी ठरू शकते याचा प्रत्यय घडवणारी घटना निगडी येथे घडलीये. सुरुवातीला आपण हा व्हिडिओ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *