लावणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणते, ” माझ्या नृत्यात कुठेही अश्लीलता नाही, आधी जे झालं…!”

613 0

पुणे : गौतमी पाटील हे नाव आज महाराष्ट्रासाठी फारसं नवीन राहिलेलं नाही. महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य करण्यासाठी गौतमी पाटील प्रसिद्ध आहे. पण तिच्या काही स्टेज परफॉर्मन्समध्ये तिने अश्लील हावभाव केल्यामुळे ती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिचे हे अश्लील भावभाव केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले, आणि त्यानंतर तिचे कार्यक्रम बंद केले जावेत असा एक सूर उमटत होता.

त्यानंतर गौतमी पाटील हिने जाहीर माफी देखील मागितली होती. दरम्यान टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी गौतमी पाटील हिने संवाद साधला यावेळी ती म्हणाली की, “माझ्या कार्यक्रमांना विरोध का केला जातोय मला माहित नाहीये, माझ्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याचं काही कारण नाही. माझ्या नृत्यात कुठेही अश्लीलता नाही. आधी जे झालं त्याबद्दल मी माफी मागितली आहे. लोकांना माझ्यावर आणि माझ्या कार्यक्रमावर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या कार्यक्रमांना गर्दी होत असते. मला महाराष्ट्राची सपना चौधरी म्हणत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. कारण सपना चौधरी नाव मोठं आहे. माझ्या कार्यक्रमांमुळे प्रस्थापित अभिनेत्री नाराज असतील असं मला वाटत नाही अशी थेट प्रतिक्रिया गौतमीने दिली आहे.

Share This News

Related Post

बांधकाम व्यावसायिक युवराज ढमालेंसह भागीदारांकडून महापालिका व रहिवाशांची फसवणूकीचा आरोप; फसवणूक झाली नसल्याचं रहिवाशांनी दिलं स्पष्टीकरण

Posted by - March 16, 2023 0
कोंढवा येथील राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे. येथील…

#punefire: पुण्यातील सातारा रस्त्यावर भीषण आग; 2 जण जखमी

Posted by - May 1, 2023 0
पुणे: शहरातील सातारा रस्त्यावर डी-मार्टनजीक मध्यराञी 02 वाजण्याच्या सुमारास  आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. दलाकडून 06 फायरगाड्या…

महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीराजेंच्या फसवणुकीचा निषेध ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

Posted by - March 21, 2022 0
महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासन पूर्ततेबाबत श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक केल्याचा आपण निषेध व्यक्त करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …

उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा कायम राहणार- अजित पवार

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *