अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहिम राबवा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

210 0

पुणे : जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहिम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंह राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारी मद्यविक्री बंद करुन संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करा. कार्यवाही करतांना पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस विभागाप्रमाणे अवैध दारू व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी खबऱ्यांची मदत घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अधीक्षक श्री.राजपूत यांनी बैठकीत विभागाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Share This News

Related Post

खुशखबर! पुणे मुंबई प्रवास फक्त अडीच तासात

Posted by - June 5, 2022 0
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला लवकरच वंदे भारत ही ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे प्रवास फक्त अडीच…

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा

Posted by - May 8, 2022 0
राज्याचे उद्योगाचे धोरण हे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारे असावे. यासाठी या धोरणातच शिक्षण -प्रशिक्षणाचा समावेश राहील यासाठी उच्च व…

Brekaing News ! दुचाकीवरुन जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरची धडक, आई आणि मुलीचा मृत्यू

Posted by - June 3, 2022 0
देहुरोड- भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कात्रज- देहूरोड बायपास…

पुणे शहरातील स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा सक्रिय सहभाग

Posted by - January 8, 2023 0
पुणे : पुण्यात होत असलेल्या जी २० परिषदेच्या निमित्ताने जनजागृती त्याचबरोबर नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक स्वच्छता करण्याच्या हेतूने पुणे महापालिकेतर्फे आज…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, हार्दिक पटेलचा राजीनामा

Posted by - May 18, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *