पुण्यातील लतादीदींच्या बालमैत्रिणीकडून जुन्या आठवणींना उजाळा

402 0

पुणे- ‘लता मनाने खूप मोठी होती, ती या जगात नाही यावर विश्वासच बसत नाही’. हे सांगताना लतादीदींच्या पुण्यातील बालमैत्रीण लीला शितोळे अत्यंत भावूक झाल्या होत्या. लता मंगेशकर आपल्या बालपणाच्या काळात पुण्यात शुक्रवार पेठेमध्ये राहत असत. त्यावेळी लीला शितोळे या लतादीदींच्या बालमैत्रीण होत्या.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लीला शितोळे यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

लाडक्या बालमैत्रिणीचे निधन झाल्याचे समजल्यापासून लीलाताईंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. इ.स १९४०-४२ या काळात लतादीदी शुक्रवार पेठेत राहत असताना जवळच असलेल्या ‘पडका’ वाड्यामध्ये लीलाताई राहत. त्यांचेही वय आता ८२ च्या आसपास आहे. त्या आजही त्याच ठिकाणी राहतात. बालमैत्रिणीच्या निधनाचे वृत्त समजताच त्या लता मंगेशकर राहत असलेल्या वाड्याजवळ बराच वेळ थांबून राहिल्या.

”माझ्या आणि लताच्या आर्थिक परिस्थितीत खूप फरक होता, मात्र त्याचा मैत्रीवर कधीही परिणाम झाला नाही”, ‘मी तिला म्हणायचे, अग तू मोठ्या घरची, माझ्याबरोबर खेळतीस म्हणून तुझी आई रागवत नाही ना ? त्यावर ती हळूवारपणे माझ्या गालावर हात फिरवून म्हणायची, ‘अंग, कोणी काही म्हणत नाही.’ घराबाहेर कोठेही जायचे असले, की ती मला हाक मारायची. तिच्या संगतीने मी मंडई व आसपास खूप फिरत असे. ती मात्र कायम काहीतरी गुणगुणत असायची. मला ते फार काही समजायचे नाही.

एके दिवशी ती अचानक घरी आली आणि म्हणाली, ‘आम्ही लवकरच मुंबईला जाणार आहोत.’ ते ऐकल्यावर मला वाईट वाटले. मुंबईला निघायच्या आदल्या दिवशी ती पुन्हा घरी आली. ‘उद्यापासून मी खेळायला येणार नाही. आता मी मुंबईला जाऊन गायिका होणार आहे,’ असे सांगितले. यावर मी तिला म्हणाले ‘छट्, काहीतरी काय सांगतेस. तू कशाला सिनेमात जाशील?’ ती मुंबईला गेल्यावर आठवडाभर मला करमले नाही. त्याकाळी काही फोनची सोय नव्हती. आणि मी तितकी शिकलेली नसल्याने पत्रही लिहू शकत नव्हती. आता सोबत फक्त तिच्या बालपणीच्याच आठवणी आहेत.’ हे सांगताना लीलाताईंना मात्र भावनांना आवर घालता आला नाही.

Share This News

Related Post

राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ ; नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Posted by - September 12, 2022 0
मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता…
Nashik News

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Posted by - May 6, 2024 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावर शीतकड्यावरून उडी मारून प्रेमी युगुलाने…
Satara News

Satara News : हृदयविकाराच्या झटक्याने बीएसएफ जवानाचं निधन

Posted by - October 26, 2023 0
सातारा : सातारा (Satara News) तालुक्यातील लिंब येथील सुपुत्र, पश्चिम बंगाल येथे बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान सुनील तुळशीदास सावंत (वय…

BIG NEWS : पुण्यातील पत्रकार भवनमध्ये अर्हम फाउंडेशनच्या ‘वास्तव कट्ट्यामध्ये’ MPSC च्या विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - December 1, 2022 0
पुणे : गुरुवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे एमपीएससीच्या MPSC विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेणे आणि त्यांची भूमिका मंत्रालयात मांडण्याच्या…
Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

Posted by - October 24, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *