ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून पडलेल्या विद्यार्थिनीचा अखेर मृत्यू

922 0

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने वैद्यकीय शिक्षण घेणारी 20 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. ही घटना बुधवारी घडली होती. उपचारादरम्यान या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे.

अदिती दलभंजन असं मृत तरुणीचं नाव असून ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. अदिती ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अदिती ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीच्या छतावर गेली. तेथून खाली पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला. गंभीर अवस्थेत अदितीला तातडीने उपचारासाठी आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून तिचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र तिने नैराश्येतून तसेच अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

Share This News

Related Post

Jan-Shivneri

Jan-Shivneri : पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी एसटीचा नवा पर्याय; आरामदायी जन-शिवनेरी बससेवा होणार सुरु

Posted by - July 22, 2023 0
पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) सर्वांत आरामदायी व वातानुकुलित सेवा मानली जाते. आता शिवनेरी बससेवा पुणे-कोल्हापूर मार्गावर (Jan-Shivneri)…

Chandrakant Patil : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं

Posted by - November 26, 2022 0
पुणे : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं…

ऋतुजा लटकेंना उच्च न्यायालयाचा दिलासा : उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा; मुंबई महापालिकेला आदेश

Posted by - October 13, 2022 0
मुंबई : अंधेरी पोट निवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या सकाळी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार राज ठाकरे यांची भेट ; मनसे-भाजप युतीचे संकेत ?

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोजच नवीन खळबळ उडवणारी घटना घडते आहे. सर्वप्रथम भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

लसीमुळे मुलीचा मृत्यू; वडिलांनी दाखल केला शंभर कोटींचा दावा; आदर पुनावाला यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच, सुनावणी होणार

Posted by - December 22, 2022 0
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्या विरोधात कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू ओढावल्याच्या आरोपाखाली उच्च न्यायालयामध्ये शंभर कोटी रुपयांचा दावा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *