पुण्यातील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

198 0

  पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागपूर : पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल विधानसभेत यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी स्मारकाविषयी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागपूर येथील विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात बैठक झाली.

यावेळी इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार श्री. भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते तर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी आमदार श्री. भुजबळ यांनी प्रास्ताविक करताना या राष्ट्रीय स्मारकामध्ये मुलींची शाळा सुरू करणे तसेच त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात याबाबत सूचना केल्या.

सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला प्राधान्य सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी.

आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्मारकाच्या कामाला कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Share This News

Related Post

उद्धव ठाकरेंचा समावेश टॉपच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत होता; अजित पवार यांच्याकडून पाठराखण

Posted by - June 24, 2022 0
मुंबई- बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही.…

कर्नाटक हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद, पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - February 10, 2022 0
पुणे- कर्नाटक राज्यात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. पुण्यात हिजाबला विरोध करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ…
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रात जोरदार पावसाबरोबर येणार ‘हे’ मोठे संकट; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - May 10, 2024 0
मुंबई : अवकाळी पावसाचा मोठा फटका महाराष्ट्रातला बसला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Weather Update) राज्यात पावसाचा इशारा…

आधी भरमसाठ किमती वाढवायच्या आणि; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर निशाणा

Posted by - May 22, 2022 0
केंद्र सरकारने आज पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा सोबतच घरघुती सिलेंडरच्या किंमतीत सबसीडी देण्याचा निर्णयाची घोषणा केली आहे. या दरम्यान…

यापूर्वी देखील बेकायदेशीर कामावर कारवाया होतच होत्या पण आधी इतका गाजावाजा नव्हता छगन भुजबळ यांचा किरीट सोमय्या यांना टोला

Posted by - March 27, 2022 0
  शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब याच्या बंगल्यावर हातोडा मारण्यासाठी काल भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दापोलीत आले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *