नवनीत राणा यांच्यावर शिवसेनेचा पलटवार ! ‘नवनीत राणा सी ग्रेड स्टंटबाज’

158 0

मुंबई- खासदार नवनीत राणा यांनीं नवी दिल्लीमध्ये नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला आता शिवसेनेने उत्तर दिले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘नवनीत राणा सी ग्रेड स्टंटबाज’ असे म्हणत टीका केली आहे.

खासदार नवनीत राणा आणि शिवसेना यांच्यातील वाद संपत संपत नाही. दिल्लीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता त्यांच्यावर शवसेनेच्या नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी तोंडसुख घेतले आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ” मर्दानी शब्द हा नवनीत राणांच्या तोंडात शोभत नाही. तुम्ही वाह्यात आहात. सी ग्रेड पब्लिसिटी करायला तुम्हाला लोक सांगतात ते तसं करतात. नवनीत राणा या सी ग्रेड पब्लिसिटी स्टंटबाजी करतात. संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्या बोलतात. त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. कितीही खालच्या भाषेत बोललं तरी उद्धवजींच्या इमेज वर परिणाम होणार नाही”

‘त्यांनी त्यांचे प्रायव्हेट क्षण व्हायरल करताना काही वाटलं नाही, स्पॅान्डलायसिससाठी स्कॅन करता, हे भाजपने सोडलेले पिल्लु आहे, ते जाणून बुजून अशी स्टंटबाजी करत आहे. नवनीत राणा या स्पॅाडिलॅसिसच्या रूग्ण नाही तर मनोरुग्ण आहेत अशी टीका पेडणेकर यांनी केली आहे.

Share This News

Related Post

Santacruz Hotel Fire

Santacruz Hotel Fire : सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

Posted by - August 27, 2023 0
मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ (Santacruz Hotel Fire) येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये (Santacruz…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन दिवसीय भाषांतर आणि अध्यापनशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिषद

Posted by - January 30, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १ व २ फेब्रुवारी रोजी भाषांतर आणि अध्यापनशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात…
Nagpur News

Nagpur News : भाजपतर्फे कामगारांसाठी आयोजित शिबीरामध्ये मोठा गोंधळ

Posted by - March 9, 2024 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात मोठा गोंधळ झाला.…
Sangli Crime

Sangli Crime : बायकोच्या ‘त्या’ अफेअरबद्दल समजताच पतीने व्हिडिओ शूट करून उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - September 27, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) पती आणि पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *