नवनीत राणा यांच्या रुग्णालयातील फोटोसेशनवरून शिवसेना आक्रमक

330 0

मुंबई- खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयाच्या एमआयआर कक्षातील फोटोसेशनमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या फोटोसेशनवर आक्षेप घेत शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी सोमवारील लीलावती रुग्णालयात जात तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. एखादा रुग्ण एमआयआर कक्षात जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टी बाहेर काढून ठेवायल्या सांगितल्या जातात. मग नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटोसेशनसाठी मोबाईल आतमध्ये कसा नेण्यात आला? यामुळे उद्या रेडिएशनमुळे स्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना काल लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडीओ शुटींग समोर आल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. या सर्व प्रकारावरून शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद घेत रुग्णालय प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

एमआयआर कक्षात मोबाईल नेणे, ही तुम्हाला गंभीर बाब वाटत नाही का? एखादा रुग्ण एमआयआर कक्षात जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टी बाहेर काढून ठेवायल्या सांगितल्या जातात. मग नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटोसेशनसाठी मोबाईल आतमध्ये कसा नेण्यात आला? यामुळे उद्या रेडिएशनमुळे स्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.

तुम्हाला कोणी जाब विचारण्यापूर्वी तुम्ही या सगळ्याची विभागीय चौकशी का केली नाही?. पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणतीही व्हीआयपी व्यक्ती असतो, रुग्णालयाचे नियम सगळ्यांना सारखे असतात. रुग्णालयांचा कारभार हा चॅरिटी कमिशनच्या नियमांनुसार चालतो. त्यामुळे तुमचे रुग्णालय खासगी असले तरी त्याठिकाणी सरकारी नियमांचे पालन झालेच पाहिजे. आम्ही असले प्रकार रुग्णालयात खपवून घेणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठणकावले.

Share This News

Related Post

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि…
Beed Accident

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - January 13, 2024 0
बीड : बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Beed Accident) घटना समोर आली आहे. बीडमधील मांजरसुंबा-पाटोदा या महामार्गावर कंटेनर आणि पिकअपचा…
eknath Shinde

Maratha Reservation : उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया होणार सुरु; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Posted by - October 30, 2023 0
मुंबई : आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नियुक्त करण्यात आलेल्या शिंदे समितीकडून प्रथम अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानंतर…

मंगेशकर कुटुंबाने 12 कोटी जनतेचा अपमान केला – जितेंद्र आव्हाड

Posted by - April 25, 2022 0
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने यावर्षीपासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी प्रदान…
Sudhir More

Sudhir More : मुंबई हादरली ! उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक सुधीर मोरेंची धावत्या लोकलखाली आत्महत्या

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *