‘….. तर मला एक नाही दोन जोडे मारा’, किरीट सोमय्या चप्पल दाखवत म्हणाले

396 0

नवी दिल्ली- अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी जर लिहून दिलं की असं केलेलं नाही तर मला एक नाही, दोन जोडे मारा. मी माझे जोडे संजय राऊतांना देतो. असे म्हणत किरीट सोमय्या यांनी आपल्या पायातील जोडा हातात घेतला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. 2013 ते 2021 या काळात सगळा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात ? त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला टॅक्स भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का ? त्या संबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला.

Share This News

Related Post

पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली ? नवा लेटर बॉंब

Posted by - May 6, 2022 0
पुणे- माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना…
no-water

Pune PMC Water Supply | पुण्यात 18 मे पासून पाणी कपात, ‘या’ दिवशी बंद राहणार शहराचा पाणी पुरवठा

Posted by - May 9, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दि. 18 मे पासून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा (Pune…

“Largest Online Album of People Holding National Flag” ; गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्धार

Posted by - August 8, 2022 0
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार…

BIG NEWS : व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना कर्ज घोटाळा प्रकरणी मुंबईत CBI ने केली अटक

Posted by - December 26, 2022 0
आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी सोमवारी व्हिडिओकॉनचे संस्थापक आणि सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक केली.…
Madandas Devi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

Posted by - July 25, 2023 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *