सोमय्यांनी सादर केली रश्मी ठाकरेंनी लिहिलेली ‘ती’ दोन पत्रे, काय आहे त्या पत्रात ?

101 0

मुंबई- भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. आज सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत थेट शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना पाठवलेले आणि रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचाला लिहिलेले पत्रच वाचून दाखवले.

संजय राऊत यांनी 11 ऑक्टोबर 2021 रोजी किरीट सोमय्या यांना पत्र पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याचे दिसून येते. संजय राऊत या पत्रामध्ये म्हणतात की, प्रिय श्री किरीट सोमय्याजी, जय महाराष्ट्र. भ्रष्टाचार आणि शासकीय पैशाचा अपहार आदी अनेक प्रकरणे आपण उघड केले. हे राष्ट्रावर उपकार झाले. त्यामुळे अनेकांना तुरुंगात जावं लागले. भ्रष्टाचार विरोधातील आपल्या लढ्याला बळ मिळावं, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावच्या सरपंचांना पाठवलेल्या पत्राचंही वाचन सोमय्या यांनी यावेळी केलं. 23 मे 2019 आणि 2 फेब्रुवारी 2019 रोजी रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना पत्र लिहिलं होतं. एका पत्रामध्ये रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी म्हटलंय की ‘आम्ही 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक अन्वय मधुकर नाईक यांच्या जागा खरेदी केल्या असून यातील असेसटमेंट क्रमांक 787 ते 779 आणि 801 ते 805 हे घर आमच्या नावे केल्यास मी आपले ऋणी राहणार’ त्यावर सरपंचाची रिसीव्ह म्हणून सही आहे. मी हे पत्रं ग्रामपंचायतीतूनच नाही तर चारही ठिकाणी आरटीआयमधून मी माहिती मिळवली आहे, असं त्यांनी सांगितलं.

2 फेब्रुवारी 2019 रोजी पाठवलेल्या दुसऱ्या पत्रात रश्मी ठाकरे म्हणतात की, ‘ही मिळकत आम्ही अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी विक्री खताद्वारे विकत घेतली आहे. आम्ही मिळकत खरेदी केली तेव्हा कोणतेही बंगले अथवा घरे नव्हती’ त्यामुळे फोर्जरी कोण करतंय? आणि चिटींग कोण करतंय? असा सवाल सोमय्या यांनी राऊत यांना केला आहे. उद्धव ठाकरे यांना पत्नीची बाजू घ्यायची नाही काय? मुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. ते जनतेची फसवणूक करत आहेत, असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला.

Share This News

Related Post

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक; आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

Posted by - December 28, 2022 0
पुणे : परदेशात वाढणारी कोविड-१९ रुग्णांची संख्या लक्षात घेता या साथरोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला…

ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन; वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

Posted by - January 9, 2023 0
मुंबई : ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड…

SANJAY RAUT : पद्मभूषण पुरस्कार बाळासाहेब ठाकरेंना का नाही ? VIDEO

Posted by - January 28, 2023 0
मुंबई : मुलायम सिंग यादव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करताना…

पुणे : जुन्नर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास राज्य शासनाकडून एक लाखांची मदत जाहीर

Posted by - September 29, 2022 0
पुणे : जुन्नर तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी दशरथ केदारी यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत द्यावी, यासाठी आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विधान…

डायरीतील मातोश्री माहिती नाहीत पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही – चंद्रकांत पाटील

Posted by - March 27, 2022 0
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *