Kirit somayya

किरीट सोमय्या हाजीर हो ! आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार

82 0

मुंबई- आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर होणार आहेत. या प्रकरणी त्यांची सलग चार दिवस चौकशी होणार आहे. तत्पूर्वी सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर आतापर्यंत अनेक आरोप केले. पण ‘खोदा पहाड निकला चूहा’ अशी स्थिती आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

सोमय्या म्हणाले की, माझ्याविरोधात साडे सात हजार कोटी, ईडी सोबत पार्टनरशिप, जुहूच्या 100 कोटीचा प्लॉट, वसई पालघरमध्ये वाधवान सोबत 426 कोटी रुपयांचा आरोप, असे जवळपास एक डझन माझ्यावर आरोप लावलेत. एसआयटी स्थापन केल्या मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ‘खोदा पहाड निकला चूहा अशी स्थिती आहे’, असा टोला सोमय्या यांनी लगावला.

मी सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे. राहिली गोष्ट आजची तर मला न्यायव्यवस्थेने सांगितले पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करा. मी न्यायदेवतेचा सन्मान करतो. ठाकरे सरकार सारखा अपमान करत नाही. आज दुपारी एक वाजता आझाद मैदान कोर्टामध्ये कोविड हॉस्पिटल घोटाळा संदर्भात मी याचिका केली आहे त्यावर आज सुनावणी आहे. ठाकरे सरकार त्या सुनावणीमध्ये हजर राहण्यास मुभा देता का हे पाहू, असे सोमय्या म्हणाले.

आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. किरीट सोमय्यांच्या या अर्जावर 13 एप्रिल रोजी हायकोर्टात सुनावणी झाली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने एक मोठा दिलासा त्यांना दिला आहे. सुनावणीपर्यंत अटक करु नये असं कोर्टाने म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि निल सोमय्या या दोघांनाही चौकशासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी न येता त्यांच्या वकिलांना पाठवत असल्याचे समोर आले होते. मागच्या वेळेस किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर नव्हते, तेव्हा त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आज किरीट सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.

Share This News

Related Post

#SANGALI : भाजप माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणात भाजप माजी नगरसेवकाचा हात; चार जण ताब्यात

Posted by - March 20, 2023 0
सांगली : जतचे भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आल…

धक्कादायक ! ससून हॉस्पिटलमध्ये रंगला पत्त्यांचा डाव

Posted by - April 3, 2022 0
पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या सर्व्हन्ट कॉटर्स ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 18 जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ससूनच्या आवारात दिवसाढवळ्या…
shailaja darade

Shailaja Darade : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या शैलजा दराडे यांना पुणे पोलिसांकडून अटक

Posted by - August 7, 2023 0
पुणे : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांना पुणे…

केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, केतकीला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी

Posted by - May 20, 2022 0
नवी मुंबई- अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ऍट्रॉसिटी कायद्यानुसार केतकीला रबाळे पोलिसांनी अटक केली असून ठाणे सत्र…

CORONA UPDATES : भारतातील कोरोनाची आताची परिस्थिती; देशात कोरोनाचे 3397 सक्रिय रुग्ण, ‘या’ राज्यांमध्ये मास्क सक्ती

Posted by - December 24, 2022 0
जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. जपान, ब्राझील या देशांमध्ये कोरोनान अक्षरशः तांडव सुरू केला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *