किरीट सोमय्यांपाठोपाठ नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला

176 0

मुंबई- सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्यांचा देखील अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, सोमय्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत निधीचा अपहार केल्याचा आरोप केला होता. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांनी माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर सोमय्या पितापुत्रांच्या विरोधात एका निवृत्त जवानाने ट्रॉमबे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती.

या प्रकरणी सोमय्या पितापुत्रांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते नॉट रिचेबल झाले. आता किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली आहे.

किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना काल पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी बजावलं होतं. मात्र सोमय्या पिता-पुत्र काल चौकशीला हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती.

सोमय्या यांचा पोलिसांकडून शोध

सोमय्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आलीय. या पथकांनी किरीट सोमय्यांचा कसून शोध सुरू केलाय. किरीट सोमय्यांचं कार्यालय, निकटवर्तीय आणि इतर ठिकाणी पथकं भेटी देत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेची टीम किरीट सोमय्या यांच्या घरापर्यंत पोहचली असून तिथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. तसंच त्यांच्या घराखाली असलेल्या त्यांच्या कार्यालयात जाऊन आर्थिक गुन्हे शाखेने काही कागदपत्रही तपासली.

मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना समन्स बजावलं असून उद्या चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. किरीट सोमय्या यांच्या घरी कोणी नसल्याने पोलिसांनी सोमय्या यांच्या घराच्या दरवाज्यावर नोटीस चिकटवली आहे. किरीट आणि नील सोमय्या या दोघांच्या घराबाहेर नोटीस चिकटवण्यात आली असून दोघांनाही उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्र्यांनी ‘धर्मवीर’ पाहिला , पण सिनेमाचा शेवट न पाहताच निघून गेले असे का ?

Posted by - May 16, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिला. पण…
Arrest

ब्रेकिंग न्यूज ! पुण्यातील तरुणाला एटीएस कडून अटक, दहशतवादी संघटनेकडून फंडिंग केल्याचा संशय

Posted by - May 24, 2022 0
पुणे- दहशतवादी संघटनेकडून फंडिंग होत असल्याच्या संशयावरून पुण्यातील एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने दापोडी परिसरातून अटक केली.  जुनेद मोहम्मद (वय…
eknath shinde

Cabinet Meeting : दिवाळीनंतर पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला…

एका होता चांदणी चौक पूल : ब्लास्ट केला पण पूर्ण पूल पडलाच नाही ? अधिकारी म्हणतात आमच्या अंदाजापेक्षा…

Posted by - October 2, 2022 0
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः त्रासला होता. गणेशोत्सव काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आले असताना ते…

‘जग्गु आणि जुलिएट’ची सगळीकडे हवा, चित्रपटाला जोरदार प्रतिसाद – ‘पुनित बालन स्टुडिओज्’ची निर्मिती

Posted by - February 14, 2023 0
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत फक्त ‘जग्गु आणि जुलिएट’चीच चर्चा ऐकू येत आहे. १० फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *