धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील यवत येथून १० वर्षीय मुलीचे अपहरण

7651 0

पुणे जिल्ह्यातील यवत गावातून एका १० वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. घराबाहेर खेळायला जाते असे सांगून ही मुलगी गेली होती. तिचा शोध घेऊन देखील न सापडल्यामुळे यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कु. सलोनी तीलकसिंग टाक (वय-१०, रा. यवत, ता. दौंड) असं अपहरण करण्यात आलेल्या मुलीचं नाव असून याप्रकरणी मुलीची आई सुनीता कौर तीलकसिंग टाक (वय-३०, रा. पॉवरहाऊस, यवत ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळायला जाते असे सांगून सलोनी घराच्या बाहेर पडली होती. परंतु ती परत न आल्याने कुटुंबीयांनी आजुबाजूला व चौफुला, केडगाव, भांडगाव, खोर येथील नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र सलोनी कोठेही सापडली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फुस लावून तिला पळून नेल्याची तक्रार तिच्या आईने दिली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी भेट दिली

मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे-

रंग- गोरा, चेहरा- गोल, केस- काळे , उंची -अंदाजे ४ फुट, अंगात निळ्या रंगाचा कुर्ता व निळ्या रंगाची पॅन्ट असून ती मराठी व हिंदी भाषा बोलते.

Share This News

Related Post

Ambernath Accident

Ambernath Accident : शिकवणी घेऊन घरी जात असताना शिक्षिकेचा भरदुपारी दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 27, 2023 0
अंबरनाथ : अंबरनाथ (Ambernath Accident) येथील पालेगावाजवळून जाणाऱ्या कर्जत काटई महामार्गावर (Ambernath Accident) एका भरधाव ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या शिक्षिकेला धडक…
Nagpur News

Nagpur News : नागपूर हादरलं ! मोबाईल दिला नाही म्हणून मुलानं आपल्या जन्मदात्या आईला दिली ‘ही’ शिक्षा

Posted by - October 21, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून निर्दयी…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ यांनी नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला

Posted by - June 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला.…
University of Pune

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Posted by - January 26, 2024 0
पुणे : उच्च शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहू नये, तळागळातील प्रत्येक विद्यार्थी हा विद्यापीठाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अविभाज्य भाग आहे, ह्याच…

उत्साहाच्या भरात काहीजण बरंच काही बोलून जातात ; अजित पवार यांची कुणाला कोपरखळी ?

Posted by - February 12, 2022 0
पुणे- पुणे महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीचे 122 नगरसेवक निवडून येतील असा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *