महत्वाची बातमी ! शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अखेर केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

733 0

ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

केतकी चितळेविरोधात आतापर्यंत ठाणे, पुणे आणि सातारा अशा तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रार दाखल केलीये. त्यामुळे आता केतकी चितळेला पोलीस चौकशीअंती अटक करणार का, हे पाहावे लागेल.

केतकीविरुद्ध राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तिच्या विरोधात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

Posted by - November 7, 2022 0
नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात…
Mumbai Police

Mumbai Police : दसऱ्यानिमित्त मुंबई पोलिसांनी नागरिकांना ‘हा’ खास संदेश देत दिल्या शुभेच्छा

Posted by - October 24, 2023 0
मुंबई : आज राज्यात सगळीकडे उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्यानिमित्त (Mumbai Police) घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे…

Breaking !! उद्यापासून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई, अनिल परब यांनी दिली माहिती

Posted by - March 31, 2022 0
मुंबई- मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत आता राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. उद्या १ एप्रिलपासून संपकरी…

लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी … ! घरोघरी गौराईंचं पारंपरिक पद्धतीने स्वागत

Posted by - September 3, 2022 0
पुणे : घरोघरी आज दुपारी महिलांनी गौरीचे थाटात, परंपरा राखत आवाहन,आगमन साजरे केले. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *