शरद पवारांच्या बाबतचा मेसेज केतकीला कुणीतरी पाठवला ? पोलिसांनी व्यक्त केला संशय

530 0

ठाणे- अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. केतकी हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त अशी पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. मात्र, तिने जो मेसेज फेसेज पोस्टवर शेअर केला होता, तो कुणी तरी पाठवला अथवा एखाद्या ग्रुपवरून आला होता, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या प्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तिला कळवा पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज ठाणे न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करत होती. आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस असल्याने तिला न्यायालयात हजर करून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल सायबर सेलच्या मदतीने तपास केला जात आहे. पोलिसांनी तिचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी केली असता केतकीने मोबाईलमधील मेसेज डिलीट केले असल्याचे समोर आले आहे. यासाठी तिचा मोबाईल फॅारेन्सिक चाचणीकरता पाठवणार आहे. तसंच तिने फेसबुकवर केलेली पोस्ट ही २०२० ची पोस्ट तिने आता का केली याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांना संशय आहे की, केतकीला कोणा एका व्यक्तीनं अथवा ग्रुपने ती पोस्ट दिली आहे, त्याचा तपास पोलीस करत आहेत.

केतकी व्हॉटसअॅप वापरत नव्हती मात्र ती सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. त्यामुळे ती इतरांशी संपर्कात राहण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर करत होती याचा देखील पोलीस तपास करणार आहेत.

 

Share This News

Related Post

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ‘ऐश्वर्य कट्ट्याचा’पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

Posted by - October 17, 2022 0
पुणे : प्रत्येक वेळी मान्यवरांच्या उपस्थितीने रंगणाऱ्या ऐश्वर्या कट्ट्यावर आज एक वेगळीच रौनक आलेली होती. उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून…
Loksabha

Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Posted by - April 22, 2024 0
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा (Loksabha) निवडणुकांसाठी जाहिरनामा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीने आपल्या जाहिरनाम्यात…
Ajit Pawar

Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा ! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय

Posted by - February 15, 2024 0
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा (Ajit…
Accident Viral Video

Accident Viral Video: ओव्हरटेक करणे पडले महागात; वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

Posted by - June 26, 2023 0
तामिळनाडूमधील कोइम्बतूरमध्ये एक धक्कादायक घटना (Accident Viral Video) घडली आहे. यामध्ये बापलेकांना अति घाई नडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात वडिलांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *