Pandharpur Temple

Pandharpur News : कार्तिकी एकादशीला कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना पुजेचा मान नाही, विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

574 0

पंढरपूर : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान कोणाला द्यायचा यावर पेच निर्माण झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाने आक्रमक होत मंदिर समितीच्या बैठकीवेळी जोरदार घोषणाबाजी केली होती. तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पुजा रोखण्याचा इशाराही देण्यात आला होता. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. यावर्षी कार्तिकी एकादशीला कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येणार नसल्याचे मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पुजा केली जाते. दरम्यान, राज्यात आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवार की देवेंद्र फडणवीस, कोणाच्या हस्ते शासकीय महापुजा होणार असा प्रश्न होता. यावर निर्णय घेण्यासाठी मंदिर समितीने बैठक बोलावली होती.

महापुजेचा पेच सोडवण्यासाठी बैठक सुरु असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांच्या महापुजेला सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. त्यावरूनच आजच्या बैठकीत सकल मराठा समाजाने गोंधळ घातला. दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देऊ नये अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती.

Share This News

Related Post

#चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवड मतदार संघामध्ये 41.1 % मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते…

राणा दांपत्याच्या जामीनअर्जावर उद्या दुपारी 2.45 वाजता सुनावणी

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दांपत्याच्या जामिन याचिकेवर उद्या दुपारी पावणे तीन…

ऑनलाइन नोंदणी शिवाय मिळेल कोरोना लस; पुणे महापालिकेचा निर्णय

Posted by - June 4, 2022 0
पुणे- पूर्वी कोविन ॲपवर नोंदणी केल्याशिवाय कोरोना प्रतिबंधक लस मिळणं शक्य नव्हतं. परंतु, आता महापालिकेच्या निर्णयानुसार ऑनलाइन नोंदणी न करता…

पुण्यातील लतादीदींच्या बालमैत्रिणीकडून जुन्या आठवणींना उजाळा

Posted by - February 7, 2022 0
पुणे- ‘लता मनाने खूप मोठी होती, ती या जगात नाही यावर विश्वासच बसत नाही’. हे सांगताना लतादीदींच्या पुण्यातील बालमैत्रीण लीला…

मुनावळे येथील पर्यटनस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Posted by - November 6, 2023 0
सातारा दि. ५ – जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *