कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद : दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अमित शहा यांनी दिला ‘हा’ निर्वाळा

364 0

नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित होते.

या बैठकीनंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर तात्पुरता काय तोडगा काढण्यात आला आहे याविषयी माहिती दिली. यावेळी अमित शहा म्हणाले की, “जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत दोन्हीही बाजूने कोणताही दावा केला जाणार नाही. सीमेवरून जो वाद निर्माण झाला होता तो संपवण्यासाठी मी दोन्हीही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि इतर महत्त्वाच्या अधिकारी आणि नेत्यांसमोर सकारात्मक चर्चा झाली आहे.

चांगल्या वातावरणात चर्चा झाली. दोन्हीही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक मुद्दे ठेवले असून सीमा प्रश्नावर भांडण करून नाही रस्त्यावर उतरून नाही तर संविधानाच्या कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटू शकतो असे या बैठकीत निश्चित झालं असल्याचं अमित शहा यांनी सांगितल आहे.

Share This News

Related Post

पुणे : फुरसुंगीतील किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग; आगीवर नियंञण मिळवण्यात यश

Posted by - November 30, 2022 0
पुणे – आज दिनांक ३०•११•२०२२ रोजी पहाटे ०४•४४ वाजता फुरसुंगी, हरपळे वस्ती, तारांगणा सोसायटी येथे एका दुकानाला आग लागल्याची वर्दि…

जिल्हाधिकाऱ्यांकडून चांदणी चौक परिसरातील कामांची पाहणी अंतिम टप्प्यातील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश

Posted by - March 15, 2023 0
पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची…

महापारेषणकडून टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम ; सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

Posted by - April 9, 2022 0
महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या १३२ केव्ही अतिउच्च दाब टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम करणे अत्यावश्यक असल्याने नगररोड, विमाननगर,…

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना महत्त्वाचा संदेश

Posted by - January 26, 2023 0
आज ७४ व्या प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिन हा दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *