कर्नाटक मुख्यमंत्र्यांची पुन्हा आडमुठी भूमिका; महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील गावांसाठी दिलेला निधी कर्नाटक सरकार रोखणार? काय म्हणाले बोम्मई, वाचा

461 0

कर्नाटक : राज्य अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील एकूण 865 गावांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून 54 कोटी निधी जाहीर केला. मात्र कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हा निधी रोखणार असल्याचं त्यांनी जाहीर केल आहे.

दरम्यान कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात येत असून विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. यावेळी बोम्मई म्हणाले की, जर महाराष्ट्र सरकार इथे निधी देत आहे. तर मी का राजीनामा द्यावा ? आपणही महाराष्ट्रातील पंढरपूर, तुळजापूर सारख्या ठिकाणांसाठी निधी दिला आहे. कारण या ठिकाणी कर्नाटकचे लोक जात असतात. या प्रकरणात मी लक्ष घालेन. काय करायला हवं हे मला शिवकुमार यांच्याकडून शिकण्याची गरज नाही. हा निधी थांबवण्यासाठी आम्ही पावलं उचलू असे देखील बोम्मई यांनी यावेळी म्हटलं आहे.

एकंदरीत परिस्थिती पाहता सीमावाद हा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह दिसून येत आहेत. महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी बहुल गावांसाठी जारी केलेल्या निधीवर कर्नाटक सरकारने घेतलेल्या या भूमिकेवर महाराष्ट्र सरकार काय प्रतिक्रिया देते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News

Related Post

#PUNE : ज्ञान तीर्थक्षेत्र आळंदी-देहू ते विद्वतनगरी काशी-वाराणसी जगाच्या नकाशावर भारत ‘विश्वगुरू’ची उद्घोषणा

Posted by - February 21, 2023 0
पुणे : भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९…

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात दाखल

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता…

पुणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

Posted by - July 29, 2022 0
पुणे: ओबीसी राजकीय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ची आरक्षण सोडत जाहीर झाली. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22…
Raj Thackery

‘हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का?’ राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वर वादावरुन फटकारलं

Posted by - May 20, 2023 0
नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) घडलेल्या प्रकाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj…
Vijay-Wadettiwar

Vijay Wadettiwar : ‘हेमंत करकरेंना कसाबने नाही तर भाजप समर्पित पोलिसाने गोळी मारली’; विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाने खळबळ

Posted by - May 5, 2024 0
चंद्रपूर : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्वच राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. असाच एक आरोप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *