Breaking News ! कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेला होणार निवडणूक

737 0

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यात 10 मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक 27 मार्च रोजी जाहीर करण्यात आलं होतं. कर्नाटक विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 24 मे 2023 रोजी संपत आहे, त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन करणं आवश्यक आहे.

राजीव कुमार म्हणाले, ” कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 58 हजारांहून अधिक मतदान केंद्रं असतील. त्यापैकी 28,866 शहरी मतदान केंद्रं असतील. 1,300 हून अधिक मतदान केंद्रं केवळ महिलासाठी असणार आहेत. 100 बुथवर दिव्यांग कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. ‘कर्नाटकात 2018-19 पासून 9.17 लाख पहिल्यांदा मतदारांची वाढ झाली आहे. 1 एप्रिलपर्यंतचे 18 वर्षांचे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतील ”

कर्नाटकात 5.22 कोटी मतदार असून नवीन मतदार जोडण्यावरही आमचा भर आहे. ज्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. राज्यात 80 वर्षे वयोगटातील 12.15 लाखांहून अधिक मतदार आहेत. 276 मतदार 100 वर्षांवरील आहेत. निवडणूक आयोग त्यांच्यासाठी विशेष मदत करेल. एकूण 5.21 कोटी मतदार असून त्यापैकी 2.62 कोटी पुरुष आणि 2.59 कोटी महिला आहेत. तसेच राज्यात एकूण 42,756 ट्रान्सजेंडर आहेत, त्यापैकी 41,000 नोंदणीकृत आहेत”

Share This News

Related Post

Gautami And Father

आडनावावरुन सुरु असणाऱ्या वादावर गौतमी पाटीलच्या वडिलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - June 2, 2023 0
मुंबई : गौतमी पाटील (Gautami Patil) ही गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्या समोरील अडचणी काही थांबायच्या नाव…
Saswad Crime

धक्कादायक ! सासवडमध्ये रस्ता स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला कारने चिरडले

Posted by - June 5, 2023 0
पुणे : पुण्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला एका व्यवसायिक कार चालकाने…

#PUNE : पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी; औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

Posted by - February 16, 2023 0
पुणे : २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे.…
Kiren Rijiju

किरेन रिजिजू यांना कायदामंत्री पदावरून हटवून; ‘या’ नेत्याकडे देण्यात आली जबाबदारी

Posted by - May 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारमध्ये (Modi Government) विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्याकडून कायदा मंत्रालयाची…
Whats App

Whatspp ने सुरु केले ‘हे’ नवीन फीचर्स; सेंड केलेला मेसेज करता येणार एडिट

Posted by - May 15, 2023 0
पुणे : आताच्या काळात जवळपास सगळेच जण व्हाट्सअ‍ॅप (Whatsapp) वापरतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअ‍ॅपचा वापर आपण एकमेकांना संदेश पाठवणे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *