पुण्यातील जंबो कोविड सेंटरमधे कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही- अजित पवार

447 0

पुणे- भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत सोमय्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

कोरोना काळात पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आलं. मात्र, या कोविड सेंटरचं काम ज्यांना देण्यात आलं ती कंपनी संजय राऊत यांच्या मित्र परिवाराची असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी एक निवेदनही पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिलं आहे. मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्या दबावामुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट लाईफलाईन कंपनीला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

किरीट सोमय्यांनी केलेल्या या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना काळात पुण्यात जम्बो हॉस्पिटल उभं केलं. यात राजकीय पदाधिकाऱ्यांना उभं न करता, विभागीय आयुक्त, पीएमसी आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आयुक्त आणि जिल्हा परिषद सीईओ यांनी मिळून काम केलं. अतिशय पारदर्शकपणे काम करण्याचं मी आधीच सांगितलं होतं. पण आता घोटाळा झाल्याच्या बातम्या आल्याने आजच्या बैठकीत हा विषय घेण्यात आला. या बैठकीत काय-काय घडलं, कशा प्रकारे कोविड केअर जम्बो हॉस्पिटलचं काम झालं याबाबत माहिती दिली. पुण्याच्या कोविड सेंटरची कामे पारदर्शक पद्धतीने झाली, जम्बो कोविड सेंटरच्या कामाशी कोणताही राजकीय संबंध नव्हता असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

सध्या जंबो कोवीड सेंटरची खुप चर्चा सुरु आहे. पुण्यात एक आणि पिंपरी-चिंचवडमधे एक अशी दोन जंबो कोवीड सेंटर उभारण्यात आली होती. या सेंटरच्या व्यवस्थापनात कोणतीही राजकीय व्यक्ती नव्ह्ती तर सगळी जबाबदारी अधिकाऱ्यांवर होती. मात्र या जंबो कोवीड सेंटरबाबत आरोप होत असल्याने पी एम आर डी ए च्या आयुक्तांना याबाबत नोट काढायला सांगितलय. पुण्यातील जंबो कोवीड सेंटरमधे कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं.

Share This News

Related Post

‘NAAC’ कडून परीक्षक मंडळाचा विस्तार ; मूल्यांकन प्रक्रिया वेगाने राबवणे शक्य

Posted by - July 22, 2022 0
पुणे : उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृतीसाठीच्या परीक्षकांची संख्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (NAAC) वाढवण्यात येत आहे. बऱ्याच…
Buldhana News

Buldhana News : ‘या’ भाजप नेत्याच्या मुलाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 11, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Buldhana News) एका युवा डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे : कालवे सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Posted by - November 25, 2022 0
पुणे : कालव्यांच्या शेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा…
Congress

Congrress : ‘हा’ काँग्रेस नेता 6 वर्षांसाठी निलंबित; नाना पटोलेंची मोठी कारवाई

Posted by - June 12, 2024 0
मुंबई : काँग्रेस नेते तसेच माजी आमदार नारायणराव मुंडे यांना काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *