पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून हत्याच ! आरोपीची कबुली, वाचा सविस्तर प्रकरण

844 0

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात वादाची नवीन ठिणगी पडली आहे. दरम्यान संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाल्यामुळे ही हत्या असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी करण्याची देखील घोषणा केली आहे.

या प्रकरणांमध्ये आता मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा पोलीस कोठडीत असून आंबेडकर यानी वारेशे याच्यावरील हल्ला हा पूर्व नियोजित कट असल्याचं मान्य केल आहे. दरम्यान आंबेरकरला मंगळवारी राजापूर न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आंबेरकरला अटक केलेल्या राजापूर पोलिसांनी बुधवारी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या कटामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का ? याचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणाच्या तपासासाठी 11 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास होणार आहे.

काय आहे प्रकरण
राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वाराशे यांचा अपघात झाला होता. पत्रकार वारीशी यांची , “मुख्यमंत्री शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसजी महोदय, आपल्यासोबत कुणाचे फोटो ? शहानिशा कराच ! ” पंतप्रधान मोदीजींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो, रिफायनरी विरोधी शेतकऱ्यांचा सनसनाटी आरोप ” अशा मथळ्याखाली महानगरी टाइम्स या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतरच त्यांचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ज्या गाडीसोबत त्यांचा अपघात झाला ती गाडी जिल्ह्यातील प्रस्तावित केलेल्या तेल शुद्धीकरण कारखान्याचा समर्थक आंबेरकर याची होती. त्यामुळेच हा मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप होत होता.

Share This News

Related Post

तंत्रनिकेतनाच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर; फेरपरिक्षेच्या निर्णयामुळे 13 हजार 787 विद्यार्थ्यांना लाभ

Posted by - October 15, 2022 0
मुंबई : मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यानंतर प्रथमच उन्हाळी 2022 ही परिक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन…
Nagpur Crime News

Nagpur Crime News : नागपूर हादरलं! पेंढरी गावात एकाच दोराने गळफास घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या

Posted by - September 5, 2023 0
नागपूर : प्रेमात, नैराश्यात तरुणांनी धक्कादायक पाऊलं उचलल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये (Nagpur Crime…

राज्यातील 7 हजार ग्रामपंचायतींचा आज धुरळा; कोणत्या जिल्ह्यात आहे निवडणूक

Posted by - December 18, 2022 0
राज्याताील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान पार पडणार आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीचा…
Police

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Posted by - April 11, 2024 0
मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी 15 एप्रिल ते 2…

दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूयात ‘नारळाचा चव आणि खव्यापासून सुरेख करंज्यांची रेसिपी

Posted by - October 13, 2022 0
दिवाळी फराळाला सुरुवात केलीत का? अनेक गृहिणींनी सामानाची जमवाजमा करायला सुरुवात नक्कीच केली असणार आहे. चला तर मग आज पाहूयात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *