स्टेट बँकेत नोकरीची संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

1570 0

भारतीय स्टेट बँकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र ही नोकरी तरुण नवख्या उमेदवारासाठी नसून पूर्वी सरकारी बँकेत कामाचा अनुभव घेतलेल्या आणि आता नोकरीतून निवृत्त झालेल्या लोकांसाठी असणार आहे.

सेंट्रल रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट (सीआरपीडी), कॉर्पोरेट सेंटर, मुंबई, स्टेट बँक ऑफ इंडियाने सेवानिवृत्त अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे तत्कालिन असोसिएट्स आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज प्रक्रियेत सामील होण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत नोंदणी करू शकतात. या संदर्भात, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 1 एप्रिल रोजी जाहिरात (No.CRPD/RS/2023-24/02) जारी केली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

स्टेट बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू शकतात. एकूण पदांची संख्या 1022 आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी, ही भरती SBI द्वारे Anytime चॅनेल अंतर्गत कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

मुलाखतीच्या आधारे स्टेट बँकेत भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी, प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी केल्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 100 गुणांसाठी मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल. (Recruitment) पात्र उमेदवारांनी बँकेच्या कोणत्या शाखेसाठी आणि कोणत्या पदासाठी जागा निघाल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी SBI भर्ती 2023चे अधिकृत नोटिफिकेशन चेक करावे.

पद आणि मिळणारा पगार

01) चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – एनीटाइम चॅनल (CMF-AC): दर महिना रु.36000/-

०२) चॅनल व्यवस्थापक पर्यवेक्षक – एनीटाइम चॅनेल (CMS-AC): दर महिना रु. 41000/-

०३) सपोर्ट ऑफिसर – एनीटाइम चॅनेल (SO-AC): दर महिना रु. 41000/-

Share This News

Related Post

शरद पवारांवरील केतकी चितळेची पोस्ट वादाच्या भोवऱ्यात ; केतकीच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

Posted by - May 14, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळेला महागात पडलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी…
Saurabh Tripathi

Saurabh Tripathi : वादग्रस्त पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती

Posted by - August 29, 2023 0
मुंबई : खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने वादात अडकलेले आणि त्यानंतर अनेक महिने फरार असलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi)…

VIDEO : मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो व्हायरल… पाहा

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय. त्यामुळं खुर्ची…

भारतीय जनता पार्टी : मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी ; प्रदेश कार्यकारिणीत स्थान

Posted by - September 15, 2022 0
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह एड. माधवी नाईक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *