अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणी सुरज पांचोली निर्दोष, सीबीआय कोर्टाचा निर्णय

2132 0

अभिनेत्री जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सुरज पांचोली याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सबळ पुराव्याच्या अभावी सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टानं जियाची आई राबिया खान यांचा अर्ज फेटाळला असून या निकालाला राबिया खान आव्हान देऊ शकतात असे कोर्टाने म्हटले आहे.

3 जून रोजी 2013 रोजी जिया खान मुंबईतील तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या मृत्यूप्रकरणात सूरज पांचोलीचं नाव आले होते. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप जियाची आई राबिया खान हिने सुरजवर आरोप ठेवला होता. सूरजच्या सांगण्यावरूनच जियाने गर्भपात केल्याचा दावाही जियाच्या आईने केला होता. तिने सुरजच्या विरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

जिया खानने आत्महत्या केली तेव्हा तिच्याकडे सुसाईड नोट सापडली होती. त्यात तिने सूरजसोबत आपले प्रेम असल्याचं स्पष्ट केले होतं. मात्र, सूरजने आपल्याशी चुकीचे वर्तन करण्यास सुरुवात केली होती. सूरजने एकदा मला घरातून बाहेरही काढलं होतं. त्याच्या या वागण्याने मी दुःखी झाले होते, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.

२० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. या निकालानंतर सुरजची आई झरीना वहाब यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र जियाची आई राबिया खान हिने कोर्टाच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Share This News

Related Post

JITENDRA AWHAD : “शासनाचा निषेध करीत मी माझा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करीत आहे…!”

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : तीन दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या मध्ये हर हर…

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत ‘या’ बड्या नेत्याचे नाव , वाचा सविस्तर

Posted by - September 24, 2022 0
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षात अध्यक्ष निवडीसाठी २० वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडते…

“12 आमदारांची दुसऱ्याच दिवशी नियुक्ती करणार होतो, पण त्या पत्रातील धमकीच्या भाषेमुळे मी सही केली नाही…!” ; तात्कालीन राज्यपाल कोश्यारी यांचा गौप्यस्फोट

Posted by - February 20, 2023 0
मुंबई : विधान परिषदेच्या 78 सदस्यांपैकी बारा सदस्यांची नियुक्ती राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करत असतात. सध्या या बारा आमदारांच्या नियुक्ती…

BIG NEWS : शनिवार नव्हे ‘अग्निवार’ ! आधी नाशिक मग वणी नंतर मनमाड; वाहन उलटल्यानं सिलिंडर मिसाइलप्रमाणं उडाले हवेत VIDEO

Posted by - October 8, 2022 0
मनमाड : नाशिकमध्ये आज पहाटेपासून सुरू झालेली अपघाताची मालिका थांबण्याचं काही नाव घेईना. आज पहाटे खासगी बसचा भीषण अपघात होऊन…

BOLLYWOOD : कतरीना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करणाऱ्या माथेफिरूच्या विरुद्ध विकीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ; विकीला दिली जीवे मारण्याची धमकी

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : बॉलीवूड जगतातील विशेष करून अभिनेत्रींना त्यांच्या फॅन्स कडून अनेक वेळा विक्षिप्त अशा कमेंट्स येत असतात. त्यांच्या सोशल मीडिया…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *