लालमहालातील ‘त्या’ लावणीच्या व्हिडीओवर जितेंद्र आव्हाड संतप्त

346 0

पुणे- पुण्याच्या ऐतिहासिक लाल महालामध्ये अलीकडेच एका लावणीचे शूटिंग करण्यात आले. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी या लावणीवर नृत्य करण्यात आले. या कृतीवर आता समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याचा विरोध केला आहे.

सध्या गाजत असलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर डान्सर वैष्णवी पाटील नृत्य करताना व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केले आहे. पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी ही नृत्यांगना बेभान होऊन अदाकारी करत नृत्य करीत आहे. या व्हिडिओवरून आता समाजाच्या सर्व स्तरातून, विविध संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही तैनात असताना हे शूटिंग कसे करण्यात आले असा प्रश्न विचारला जात आहे. सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याचा आरोप केला जातोय.

लाल महाल ही वास्तू नाच-गाण्यांचे चित्रीकरण करण्याची नव्हे- जितेंद्र आव्हाड

या सर्व प्रकारावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याचा विरोध केला आहे. ते म्हणतात, “पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका”

Share This News

Related Post

NCP

राज्याच्या राजकारणात किंगमेकर ठरलेल्या राष्ट्रवादीची ‘अशी’ झाली स्थापना

Posted by - June 10, 2023 0
10 जून 1999 राज्याच्या राजकारणातील मोठा दिवस याच एका राजकीय पक्षाचा उदय राजकीय पटलावर झाला हा राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी…

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचा भाजपाला अभिमान; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन*

Posted by - July 1, 2022 0
मुंबई: भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी  देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला.…
Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रो स्टेशनच्या बांधकामादरम्यान लोखंडी भाग कारच्या बोनेटवर पडून भीषण अपघात

Posted by - August 11, 2023 0
पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) स्टेशनचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना काल येरवडा या ठिकाणी एक भीषण दुर्घटना घडली…

माळीणची पुनरावृत्ती; रायगड जिल्ह्यातील इरशाळ गाव ढिगाऱ्याखाली; मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

Posted by - July 20, 2023 0
रायगड : जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका वसाहतीवर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये 120 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेअसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेहबाहेर काढण्यात आले आहेत. तसंच एकूण 27 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. यामध्ये सुमारे 90 घरे ढिगाऱ्याखाली गेली असून अधिक जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली…

मोठी बातमी! उद्योगपती अविनाश भोसले यांना 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी

Posted by - May 31, 2022 0
पुणे- प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. डीएचएफएल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *