जिओची भन्नाट ऑफर ! वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज आणि दररोज ३ जीबी डेटा आणि Disney+Hotstar फ्री

209 0

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठ्या असलेल्या जिओ टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीने दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारा वर्षभराचा प्लान उपलब्ध करून दिला आहे. या प्लानची किंमत ४,१९९ रुपये असून हा कंपनीचा सर्वात महागडा प्लान आहे. या प्रीपेड प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे अगदी १५ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहे. तुम्ही जर दररोज जास्त डेटा वापरत असाल तर दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारा प्लान नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.

रिलायन्स जिओ चा ४,१९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

या प्लानची वैधता १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवस आहे. यामध्ये यूजर्सला दररोज ३ जीबी डेटा याप्रमाणे एकूण १०९५ जीबी डेटा दिला जातो. दररोज मिळणारा हाय-स्पीड डेटा समाप्त झाल्यास तुम्ही ६४ Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. यात देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय, या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील दिले जात आहे. यात १ वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील मिळतो.

Disney+Hotstar Premium Subsription ला असे करू शकता अ‍ॅक्टिव्हेट

सर्वात प्रथम https://www.hotstar.com/in/subscribe/promo वर जा.
त्यानंतर तुमच्या जिओ नंबरने साइन इन करून ओटीपी व्हेरिफाय करा.
आता MyJio अकाउंटमध्ये दिलेल्या डिज्नी+ हॉटस्टार प्रीमियम कोडला एंटर करा.
पुढे कन्फर्म केल्यानंतर तुमचे Disney+Hotstar Premium Subsription सुरू होईल.

Share This News

Related Post

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना प्रवक्त्यांची बैठक

Posted by - August 3, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…

बालगंधर्व रंगमंदिराचा होणार कायापालट, पण रंगकर्मींचा विरोध

Posted by - May 9, 2022 0
पुणे- बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकास मॉडेलला मंजुरी मिळाल्यामुळे आता बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार हे निश्चित झाले आहे. बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे…

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सव आणि ‘चेतना’ केंद्राचे उद्धाटन

Posted by - September 30, 2022 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या…

करवा चौथ 2022 : पतीच्या दीर्घायुष्यासाठी आज संध्याकाळी अशी करावी पूजा , चंद्रोदय ,महत्व, मान्यता, मुहूर्त वाचा सविस्तर

Posted by - October 13, 2022 0
करवा चौथ हा विवाहित हिंदू स्त्रियांद्वारे पाळल्या जाणा-या सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, समृद्धीसाठी आणि सुरक्षिततेसाठी एक दिवसाचा…
Agricultural Dispute

Agricultural Dispute : भंडारा हादरलं ! पुतण्याने भररस्त्यात ‘या’ कारणामुळे केली काकूची हत्या

Posted by - August 7, 2023 0
भंडारा : आजकाल शेतीवरून मोठ्या प्रमाणात वाद (Agricultural Dispute) पाहायला मिळत आहेत. हे वाद एवढे टोकाला जातात कि यामध्ये लोक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *