State level cycle competition : ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण खेळाडू घडणे आवश्यक : दिलीप वळसे-पाटील

138 0

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या शुभारंभ

पुणे : पुणे जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. विशेषतः अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीने व कल्पक नेतृत्वाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यशाच्या शिखरावर वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी असून यामधून राज्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपजी वळसे – पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

हे हि वाचा : Maharashtra Politics : शिवसेनेचे खासदार-आमदार शिंदे गटात, परंतु कार्यकर्ते पक्षप्रमुखांबरोबर 

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, विधानसभा सदस्य आ. रोहित पवार, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अंकुश काकडे, माजी महापौर दिपक मानकर, सिने अभिनेते महेश कुलकर्णी, सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख अधिष्ठाता डॅा. विजय खरे, अधिष्ठाता डॅा. दिपक माने, अधिष्ठाता डॅा. मनोहर चासकर बाबुराव चांदेरे, सुनिल चांदेरे, सुनिल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचे प्रास्ताविक करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेची संकल्पना व महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर या सायकल स्पर्धेची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे असे नमूद करत पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे विद्यापीठ नेहमी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.

आपल्या मनोगतामध्ये विधानसभा सदस्य आ. रोहित पवार यांनी कोविड महामारीच्या काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता गेली सात वर्षे सातत्याने या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. तसेच युवा वर्गाला आपले नैपुण्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे असे नमूद करत अशा प्रकारच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवायची संधी मिळते, असे स्पष्ट केले.

सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतूक करत स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
सदर उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन अमृता खराडे, नितीन लगड तर आभार प्रदर्शन अॅड. मोहनराव देशमुख यांनी केले.
या उद्घाटन समारंभाच्या यशस्वितेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मणराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share This News

Related Post

पुणे : बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार रामहरी कराड यांना जाहीर

Posted by - January 3, 2023 0
पुणे : पत्रकारीता क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार २०२३ हा पुरस्कार पुणे येथील दै. नांदेड एकजूटचे प्रतिनिधी रामहरी…
Rajkumar Kohli

Rajkumar Kohli : ‘जानी दुश्मन’चे दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन

Posted by - November 24, 2023 0
मुंबई : हिंदी मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन…

मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; अनिल बोंडेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

Posted by - June 20, 2022 0
विधापरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षांनी या विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या दहा…

कोल्हापूर गोकुळ शिरगाव एमआयडीसीत भीषण आगीची घटना

Posted by - January 14, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर मधील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये ही आग…
Rahul Tripathi

Pune News : ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या कर्णधारपदी राहुल त्रिपाठीची निवड; पुनीत बालन यांनी केली घोषणा

Posted by - June 4, 2024 0
पुणे : टीम इंडियात एकेकाळी महाराष्ट्राचा झेडा डौलाने फडकवत ठेवणारा आणि सध्या सुरु असलेल्या ‘एमपीएल’मधील कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार केदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *