१२५ डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे साखळी फटाके उडविण्यास मनाई

331 0

पुणे : दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते २३ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणारे फटाके उडविण्यास रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण मनाई केली आहे.

या कालावधीत १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या आणि १२५ डेसीबल पेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे सर्व साखळी फटाके उडविण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही रस्त्यावर किंवा रस्त्यापासून ५० फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारु काम सोडणे किंवा फेकणे अगर आगी फुगे (फायर बलून) किंवा अग्नीबाण सोडणे, उडविणे असे कृत्य करणे, एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.

साखळी फटाका ५० ते १०० तसेच १०० व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११०, ११५ व १२५ डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये.

या आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३१ प्रमाणे कायदेशीर शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

accident

पुण्याच्या वाघोलीत ट्रकखाली सापडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Posted by - June 3, 2023 0
वाघोली : पुण्यातील वाघोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बोअरवेल ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा…

सोशल मीडियावर पुणे मेट्रोतले भन्नाट किस्से व्हायरल !…पाहा व्हिडीओ

Posted by - March 12, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. पण म्हणतात ना ‘पुणे…

भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट*

Posted by - September 11, 2023 0
पुणे: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे…
Pune News

Pune News : बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे-हर्षदा फरांदे

Posted by - December 4, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहारामध्ये मोठ्या संख्येने महिला गृहिणी बचतगटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन व विक्री करतात व त्यातून…

बोधी ट्री सिस्टीम व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Posted by - April 28, 2022 0
जेम्स मर्डॉकच्या लुपा सिस्टम्स गुंतवणूक उपक्रम बोधी ट्री सिस्टम्स आणि उदय शंकर यांनी ब्रॉडकास्टिंग सेवा कंपनी व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *