राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गावरील खाड्यांमुळे असुविधा होतेय ? या टोल फ्री क्रमांकावर नोंदवा तक्रार

132 0

पुणे : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर जिल्ह्यातील विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्र.१८००२३३१५४८ कार्यान्वित करण्यात आला आहे.

तक्रारीसाठी ही दूरध्वनी सेवा सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु असणार आहे. सामान्य नागरिकांना सा. बां. विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या खड्ड्यांबाबत काही तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी ती वरील दूरध्वनी क्रमांकावर नोंदवावी. तक्रार नोंदविताना तक्रारदाराचे नाव व दूरध्वनी क्रमांक नोंदवावा, जेणेकरुन तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल संबंधितास कळविणे शक्य होईल.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी विभागाने आपले संकेतस्थळ www.mahapwd.com यावर ‘सिटीझन’ या भागात ‘पॉटहोल रिलेटेड कम्प्लेंट’ (खड्ड्यांबाबत तक्रार) मध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करुन सार्वजनिक बांधकाम विभागास खड्डेमुक्त रस्ते वापरात ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक मुख्य अभियंता मिलिंद बारभाई यांनी केले आहे.

Share This News

Related Post

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Posted by - January 8, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : आपण जेंव्हा गुजराती आणि बंगाली चित्रपटांबद्दल बोलत असतो तेंव्हा तो (Ashutosh Gowariker) एका विशिष्ट राज्याचा असतो. मात्र,…
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

Posted by - March 5, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने स्कूल व्हॅनच्या समोरील…
Suhas Diwase

Pune News : जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधांची उभारणी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Posted by - May 5, 2024 0
पुणे : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा (Pune News) मतदार संघात 7 मे रोजी तर चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी…
Pune Metro

Pune Metro : वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

Posted by - March 11, 2024 0
पुणे : राज्य मंत्रिमंडळाने आज (11 मार्च), पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत…

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृती विषयी घेतली माहिती

Posted by - December 23, 2022 0
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृतीविषयी माहिती घेतली. खासदार बापट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *