वेळेच्या आतच पगार संपतोय ? ऐनवेळी ‘Pay-Day Loan’ सुविधा मदत करू शकते , वाचा सविस्तर माहिती

222 0

अनेक जण नोकरी करून सुद्धा आर्थिक अस्थिरतेने हैराण झालेले असतात. पगार झाला कि घरातल्या गरजेच्या वस्तूंवरच सर्व पगार खर्च होतो . मग बचत आणि आपल्या वैयक्तिक आनंद , छंद , मौजमजा , फिरायला जाणे हे करता येत नाही. दिवसभर मेहेनत करायची पण सर्व पगार सामान्य गर्जनाही नीट पुरेनासा होतो तेव्हा कामाची मरगळ येते.

अशावेळी ‘पे-डे लोन’ सुविधा मदत करू शकते. या माध्यमातून थकीत बिलाचा भरणा करू शकतो आणि पुढील वेतन जमा झाल्यानंतर ‘पे-डे लोन’ फेडता येऊ शकते. हे एक उच्च रक्कमेचे असुरक्षित कर्ज समजले जाते. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपण एखादेवेळी आर्थिक अडचणीत असाल आणि त्यासाठी पैशाची सोय करताना तारांबळ उडत असेल तसेच वैयक्तिक कर्ज घेण्यास पात्र नसाल तर आपण ‘पे-डे लोन’ चा विचार करू शकता.

हा एक कर्जाचा किरकोळ प्रकार असून त्याची परतफेड पुढील महिन्याच्या पगारापर्यंत करता येऊ शकते. साधारणपणे कर्ज घेतल्यानंतर दोन ते चार आठवड्यातच त्याचा भरणा करावा लागतो. हे एक हायकॉस्ट अनसिक्यूर्ड लोन असून ते थोड्या काळाकरता घेता येते. अशा प्रकारचे कर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे मिळते.

या कर्जाची फेड पुढील पेमेंट डेटवर करू शकता. काहीवेळा विशेषत: खासगी क्षेत्रातील नोकरदारांचे वेतन लवकर जमा न झाल्यास किंवा लवकर खर्च झाल्यास नियमित बिल भरण्यास अडचण येऊ शकते. अशावेळी ‘पे-डे’ कर्जाच्या सुविधेचा लाभ घेत बिल भरण्याबरोबरच अन्य घरखर्च भागवता येतो. अर्थात हे कर्ज उच्च व्याजदरासह दिले जाते. तरीही अनेक ग्राहक गरजेमुळे जादा व्याजदराचे कर्ज घेतात. यामागचे आणखी एक कारण म्हणजे या कर्जासाठी ग्राहकाला कोणत्याही प्रकारच्या कॉलेटरल आणि गॅरेंटरची आवश्यकता नाही.

‘पे-डे’ कर्जाचे वैशिष्ट्ये

‘पे-डे’ कर्जासाठी अर्ज करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
या योजनेनुसार ग्राहकांना कमी रक्कम कमी कालावधीसाठी दिली जाते.
कर्जाची रक्कम सॅलरी पेमेंट होईपर्यंतच्या तारखेपर्यंत फेडता येऊ शकते.
लोन रिपेमेंटसाठी 2 ते 4 आठवड्यापर्यंतचा वेळ दिला जातो.
कर्ज देणारी कंपनी कालावधीच्या नियमांची माहिती देतात.
अशा प्रकारचे कर्ज ग्राहकांच्या खात्यात तात्काळ जमा होते.
पे-डे लोनतंर्गत कर्ज देणार्‍या कंपन्या ग्राहकांच्या क्रेडिट हिस्ट्रीकडे लक्ष देत नाहीत.
अनसिक्यूर्ड कर्ज असल्याने कर्जदाराला सामान गहाण ठेवावे लागत नाही.

पात्रतेचे निकष

कर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे.
ग्राहक भारतीय नागरिक असावा
ग्राहकाकडे नियमित उत्पन्नाचे स्रोत असणे आवश्यक
करंट खाते सक्रिय असणे गरजेचे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना. रहिवाशी प्रमाणपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, कंपनीकडील ऑफर लेटर, पासपोर्ट आकाराचा फोटो.

असा करा अर्ज

पे-डे लोन कर्ज देणार्‍या कंपन्याच्या किंवा बँकाच्या कार्यालयात ऑफलाइन अर्ज भरावा किंवा ऑनलाइनवर देखील अर्ज भरता येतो.
अर्जातील विवरण काळजीपूर्वक भरावे.
कर्जदारांनी आर्थिक कंपनीला हवी असलेली कागदपत्रे जमा करावीत.
कर्ज मंजूर झाल्यानंतर आर्थिक कंपनीला अन्य महत्त्वाची कागदपत्र सादर करावीत.
सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा केली जाईल.

Share This News

Related Post

‘… आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, काय आहे या पत्रात ?

Posted by - May 10, 2022 0
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरल्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. एकूणच राज्यात या मुद्द्यावरून…

धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक

Posted by - April 21, 2022 0
इंदूर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिला अटक करण्यात…

लंपी नियंत्रणासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक

Posted by - September 19, 2022 0
पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण…
Vijay-Wadettiwar

मविआत मोठा भाऊ कोण? वडेट्टीवारांनी दिले स्पष्ट उत्तर

Posted by - May 22, 2023 0
नागपूर : सध्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा येणार यावर चर्चा सुरू आहे. शरद पवार…

एकनाथ शिंदे गटाला भाजपाची मोठी ऑफर ? शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *