“राऊत लहान माणूस आहे का ? त्याला हे बोलणं शोभतं का ?” संजय राऊत यांनी आरोप केलेल्या राजा ठाकूर याचा प्रतिवार, कोण आहे राजा ठाकूर… वाचा सविस्तर

689 0

मुंबई : संजय राऊत यांनी काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपल्या जीविताला धोका आहे असा गोप्त स्फोट केला दरम्यान थेट खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्यासाठी ठाण्यातील कुप्रसिद्ध गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली असल्याचा या पत्रामध्ये नमूद केलं होतं त्यांच्या या पत्रानंतर एकच खळबळ उडाली होती त्यांनी काय पत्र लिहिलं होतं हे वाचा… 

दरम्यान या पत्रावर न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने थेट राजा ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खळबळ जनक स्पष्टीकरण दिला आहे यावेळी राजा ठाकूर म्हणाले की, ‘संजय राऊत यांच्या स्वप्नात पण असं दिसत असेल तर याला आपण काय करणार?,’ असं राजा ठाकूर म्हणाले. संजय राऊत तुम्हाला सुपारी दिली असल्याचं म्हणत आहेत, असा प्रश्न ठाकूरना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी राऊत लहान माणूस आहे का? त्याला हे बोलणं शोभतं का? असं उत्तर दिलं.

संजय राऊतांचे खळबळजनक पत्रं ! “ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आली आहे…” संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र, वाचा काय आहे प्रकरण….

तुमची आणि श्रीकांत शिंदे यांची भेट झाली होती का? असा प्रश्नही राजा ठाकूरना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी श्रीकांत शिंदे आमच्या मतदार संघाचे खासदार आहेत. शिवसेनेचं नाव गेल्यापासून ते सगळ्यांवर आरोपच करत आहेत. त्यांची लोक त्यांना सोडून गेली तेव्हापासून त्यांचं कामच आरोप करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची, अशी टीका ठाकूर यांनी केली.

‘माझ्या इज्जतीची वाट लावत आहेत, मला गुंड बोलणारे हे कोण आहेत?’ असा प्रश्नही ठाकूर यांनी विचारला आहे. तुमच्यावर खंडणी, मर्डर, हाफमर्डरच्या केसेस आहेत का? असा प्रश्नही ठाकूरना विचारण्यात आला. तेव्हा मी जामिनावर आहे, कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिली आहे, असं उत्तर राजा ठाकूरनी दिलं.

Share This News

Related Post

Ajit Pawar

काम केले नाहीतर तर कानाखाली देईन; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं

Posted by - June 5, 2023 0
पुणे : आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भरसभेत संवाद साधत असताना कार्यकर्त्यांना झापलं आहे. यावेळी…
Maharashtra Election

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Posted by - March 22, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.…
Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंना धमकी ! 19 वर्षीय विद्यार्थ्यांला पुण्यातून अटक

Posted by - February 24, 2024 0
मुंबई : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पुत्र खासदार श्रीकांत शिंदे…

VIRAL Video : महिलेला अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करणे पडले महागात ; श्रीकांत त्यागी गजाआड

Posted by - August 9, 2022 0
Shrikant Tyachi Case : काही दिवसांपूर्वी श्रीकांत त्यागी याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बेकायदेशीर बांधकामावरून एक महिला श्रीकांत त्यागी…

धनंजय मुंडे यांना यांना हार्टअटॅक नाही, अजितदादांनी केले स्पष्ट

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आली त्यामुळे शुद्ध हरपली. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी खोटी असल्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *