पावसाळी अधिवेशन : औरंगाबाद उस्मानाबाद आणि नवी मुंबई नामांतराचा ठराव मंजूर

273 0

पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे . दरम्यान एकीकडे आंदोलने , आरोप प्रत्यारोप होत असताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा आणि निर्णय होत आहेत . दरम्यान आज औरंगाबाद , उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव देखील मंजूर झाला आहे.

त्यामुळे औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर , उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील विमानतळ असल्यास मंजुरी मिळाली आहे. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावर आक्षेप घेण्यात आला होता . राज्य शासनाने घेतलेला नामांतराचा निर्णय हा केवळ राजकीय हेतूने घेतला असल्याचा आरोप करण्यात येत होता .

मुंबई उच्च न्यायालयामध्ये 1998 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आला असल्याचे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले होते. तथापि हा निर्णय शासनाने 2001 रोजी रद्द केला . हा निर्णय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या विरोधात आहे . फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतराचे निर्णय घेता येणाऱ नाहीत. नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे , असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

Share This News

Related Post

#चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वाटप

Posted by - February 25, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणूक निरीक्षक…

अखेर ठरलं! भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केला सत्यजित तांबे यांना पाठिंबा

Posted by - January 29, 2023 0
नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण, त्याआधी भाजपचे खासदार…
ED

Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयकडून अटक

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक…
CM EKNATH SHINDE

शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Posted by - April 5, 2023 0
शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली असून सततचा पाऊस आता नैसर्गिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *