बॉलिवूड तारे-तारका, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आयपीएलची सांगता

365 0

अहमदाबाद- आयपीएल 2022 चा अंतिम सामना हमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर 29 मे रोजी होणार असून या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सुपरस्टार रणवीर सिंह यांच्यासह संगीतकार ए.आर. रहमान तसेच क्रिकेट जगतातील मोठमोठ्या व्यक्तिमत्वाचा समावेश असणार आहे. एकूण यंदाचा आयपीएल 2022 चा समारोप दणक्यात होणार आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आधीच फायनलमध्ये पोहचलाय. तर राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहचणार आहे. फायनलचा सामना सुरु होण्याआधी एक दमदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. आयपीएलचा क्लोजिंग समारोप 29 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे. हा कार्यक्रम 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

26 मार्च रोजी आयपीएलचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याठिकाणी तब्बल 6 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

नवले पूल अपघात प्रकरणी ट्रक चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Posted by - November 22, 2022 0
पुणे : नवले पूल येथे अपघातात फरार झालेल्या चालकाला सिंहगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मनिराम यादव असे अटक करण्यात…

‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या कार्यशाळेचे उद्घाटन

Posted by - October 18, 2022 0
पुणे : मिशन वात्सल्यअंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ तसेच ‘कारा’ दत्तक नियमावली…
Vishnu Deo Sai

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Posted by - December 10, 2023 0
छत्तीसगड : वृत्तसंस्था – भाजपने छत्तीसगडच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करून आपली सत्ता मिळवली होती. त्यानंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी…

सावित्रीबाई फुले कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ- देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
पुणे – ज्योतिबांच्या कामाला सावित्रीबाईंनी सामाजिक साथ दिली. त्या स्वतःही कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. ज्योतिराव गेल्यांनंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांचे…
Chandni Chowk

Chandni Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपूल आजपासून प्रवाशांसाठी खुला; कशा आहेत मार्गिका?

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची (Chandni Chowk Flyover) ओळख आहे.त्या चौकामध्ये (Chandni Chowk Flyover) प्रवाशांना अनेक वर्षांपासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *