Milk

Milk : दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा,अन्यथा आंदोलन करू; किसान सभेचा दुग्धविकास विभागाला इशारा

1578 0

राज्यात दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे (Milk) भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाच्या चढ उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खाजगी व सहकारी दुध संघांचे व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर ठरवावेत व दुध संघांनी आणि कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले होते. यानुसार दुधाला 34/- रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र या दरात रिव्हर्स दराची मेख मारून दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच धाब्यावर बसविण्यात आला आहे. 34/- रुपयाऐवजी बेस रेट 27/- रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे.

राज्यात सणासुदीच्या काळात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई निर्मितीसाठी दुधाची मागणी वाढलेली असताना व दुष्काळ असल्याने दुधाचे उत्पादन घटले असताना मागणी पुरवठ्याचे गणित पाहता दुध दर वाढायला पाहिजे होते. मात्र या उलट मागणी कमी व उत्पादन अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दुध कंपन्यांचा हा दर पाडण्यासाठी केलेला कांगावा आहे. शिवाय या सोबतच राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली बनावट दुध निर्मिती हेही दर कोसळण्या मागचे एक मोठे कारण आहे. जोडीला सदोष मिल्कोमीटर व वजनकाट्यांचा वापर करून शेतकऱ्यांची लुटमार नित्याची बाब आहे.

भेसळयुक्त दुध नियंत्रणाची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाकडे आहे. वजनकाटे व मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी वजनकाटे वैधतामापन विभागाकडे आहे. दोन्ही विभाग ‘मनुष्यबळाचा अभाव’ हे कारण देत आपली जबाबदारी झटकत आले आहे. अशा पार्श्वभूमीवर दुध भेसळ, वजनकाटे आणि मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी संबंधित विभागांकडून काढून घेऊन दुग्धविकास विभागाकडे दिल्यास याबाबतचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने याबाबत तसा निर्णय करावा तसेच दुधदर निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीस कायदेशीर वैधता द्यावी, या समितीची दर शिफारस दुधसंघ व दुध कंपन्यांवर बंधनकारक करावी, गायीच्या दुधाला किमान 35/- रुपये दर मिळेल यासाठी हस्तक्षेप करावाअशी मागणी अखिल भारतीय किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून… मनोज जरांगेचा मोठा आरोप

Nashik News : गॅस भरताना ओमनी कारचा अचानक झाला स्फोट; चिमुकल्यांसह 10 जण जखमी

Share This News

Related Post

#Mental Health : जेव्हा उगाचच निराश वाटतं ! फक्त ‘हे’ हलकेफुलके बदल करून पहा, स्वतःची किंमत करायला शिकाल…

Posted by - February 16, 2023 0
बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण एकटे आहोत, उगाचच निराश झाल्यासारखं वाटतं, आजूबाजूच सगळं वातावरण भकास वाटायला लागतं, जर तुम्हालाही…

श्रीलंकेत आणीबाणी, राष्ट्राध्यक्षांच्या घरावर जमावाचा हल्लाबोल

Posted by - April 2, 2022 0
कोलंबो- आर्थिक संकटामुळे वाढत्या अशांततेमुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी देशात सार्वत्रिक आणीबाणी लागू केली. सार्वजनिक आणीबाणी जाहीर करणारा…

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी कुणी मिळेल का ?

Posted by - July 21, 2022 0
पुणे : राज्यातील पहिली हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची नोंद झाली आहे. राज्यात मंत्रालयानंतर अशाप्रकारची इमारत केवळ…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन होणारं नवीन संसद भवन आहे तरी कसं ?

Posted by - May 28, 2023 0
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या सेंट्रल विस्टा अर्थात नवीन संसदेचा आज लोकार्पण होत असून दुपारी एक वाजता…
crime

पिंपरी-चिंचवड शहरात दोन चिमुकल्यांवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला

Posted by - May 28, 2023 0
भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असतानाच पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळतीय भटक्या कुत्र्याने दोन चिमुकल्या मुलावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *