मुनावळे येथील पर्यटनस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

1141 0

सातारा दि. ५ – जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज नियोजित मुनावळे पर्यटनस्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुनावळे पर्यटनस्थळाचा स्थानिकांनी आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा, हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यात आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. हे सर्व करताना सुरक्षेचा संपूर्ण विचार करण्यात आला आहे. निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम आदी सोयीदेखील याठिकाणी करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मासेमारीसाठी स्थानिकांना परवानगी देण्यात यावी, जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराची हवाई पाहणी केली.

Share This News

Related Post

बापरे ! जालन्यात श्री श्री रविशंकर यांचे दर्शन घेण्यासाठी वाहनासमोर पडल्या श्रद्धाळू महिला, आणि मग…

Posted by - February 2, 2023 0
जालना : जालन्यामध्ये आज मोठा अनर्थ होताना वाहन चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला आहे. तर झालं असं की, जालन्यात आज शेतकरी मेळावा…

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन

Posted by - July 8, 2022 0
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं…

विद्यापीठात लवकरच ड्रोन विषयक विविध अभ्यासक्रम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘ड्रोनआचार्य एरियल’ सोबत सामंजस्य करार

Posted by - March 15, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ड्रोनविषयक अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी, पदविका अभ्यासक्रमांचा समावेश असणार…

दुर्दैवी ! जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना यंत्रात पदर अडकून महिलेचा मृत्यू

Posted by - May 16, 2022 0
नेवासा – जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना दुर्लक्ष झाल्यामुळे एका महिलेचा पदर यंत्रात अडकला. यंत्रात फिरणाऱ्या बेल्टसहित महिला यंत्रामध्ये ओढली गेली. कडबाकुट्टी…

आर्यन खानला मिळाला दिलासा, एनसीबी विशेष चौकशी समितीच्या अहवालात माहिती

Posted by - March 2, 2022 0
मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीनं स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *