#INFORMATIVE : डिमॅट आणि ट्रेडिंग खाते म्हणजे काय ? असा ओळखा फरक

735 0

शेअरबाजारात गुंतवणूक करायची असेल तर डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट असणे गरजेचे असते. त्याशिवाय आपल्याला इक्विटी मार्केटमध्ये पैसा टाकता येत नाही. डिमॅट उघडण्यासाठी केवायसी असणे गरजेचे आहे. आपल्या सर्वसाधारण खात्यासारखेच हे डिमॅट अकाऊंट असते. मात्र ट्रेडिंग अकाऊंट आणि डिमॅट अकाऊंटमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे शेैर बाजारातील शेअर विक्री आणि खरेदी करणे यात असतो. डिमॅट अकाऊंटला ट्रेडिंग पद्धतीतंर्गत शेअर खरेदीची सुविधा मिळते. डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात कोणता फरक आहे आणि त्याची गरज काय आहे, हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे.

ट्रेडिंग खाते म्हणजे काय?

जर कोणी खरेदीदार शेअर विकत घेत असेल तर त्याला अगोदर ट्रेडिंग अकाऊंट असणे बंधनकारक ठरते. हे खाते ग्राहकाला शेअर खरेदी आणि विक्रीची सुविधा उपलब्ध करून देते. हे खाते शेअर बाजाराशी जोडलेले असते की ज्याठिकाणी शेअरच खरेदी विक्री केली जात असते. आपले ट्रेडिंग खाते हे बँक खात्याशी जोडणे अनिवार्य ठरते. त्यामुळे आपल्या बँक खात्यातील रक्कम ही ट्रेडिंग खात्यात जमा होते. त्यानुसार ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला पैसा उपलब्ध होतो आणि शेअरची खरेदी करू शकतो. तसे पाहिले तर ट्रेडिंग अकाऊंट हे शेअर बाजार, बँक खाते आणि डिमॅट खाते यांच्यात दुवा साधण्याचे आणि मध्यस्थाची भूमिका बजावत असते.

डिमॅट खाते म्हणजे काय?

शेअर खरेदी करण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे गरजेचे आहे. हे डिमॅट अकाऊंट आपल्या एखाद्या बँक लॉकरप्रमाणे असते. त्याठिकाणी आपण पैसे ठेवून बाजारातील स्थितीप्रमाणे शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो. डिमॅट अकाऊंट आपण दलालामार्फत सुरू करू शकतो किंवा अनेक बँकांनी डिमॅट अकाऊंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. सेबीच्या नियमानुसार इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी ग्राहकाला डिमॅट खाते असणे जरुरी आहे. अनेक बँका किंवा दलाल ग्राहकाला डिमॅटबराबेरच ट्रेडिंग अकाऊंट सुरू करण्याचीही सोय उपलब्ध करून देते. डिमॅट अकाऊंट देखील बँक खात्याला जोडलेले असते आणि त्यातून डिमॅटमध्ये पैसे ऑनलाइन माध्यमातून जमा करता येते. आपण जोडलेल्या खात्यातूनच डिमॅटमध्ये व्यवहार करू शकतो.

Share This News

Related Post

Share Market

Share Market : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उद्या शेअर मार्केट बंद राहणार ?

Posted by - September 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्या गणेश चतुर्थी असल्याने सगळीकडे धामधूम सुरु आहे. वर्षातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हा सण…

शिरूरमध्ये न्यायालय परिसरात माजी सैनिकाचा पत्नी आणि सासूवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू, सासू जखमी

Posted by - June 7, 2022 0
पुणे – घटस्फोटाची केस सुरु असताना न्यायालयाच्या परिसरात गोळीबाराची थरारक घटना घडली. या घटनेत एका माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर…

मुंबई : तुम्हीही लग्नाचा वाढदिवस विसरता का ? ही बातमी वाचा, लग्नाच्या वाढदिवस विसरला म्हणून नवरा बायको मध्ये रप्पाधप्पी

Posted by - February 24, 2023 0
मुंबई : ऐकावं तेवढं नवलच अशी एक घटना घडली आहे. आत्तापर्यंत लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून नवरा बायको मध्ये भांडण, नाराजी…
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, ‘या’ मतदारसंघातून करणार सुरुवात

Posted by - August 5, 2023 0
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येत्या 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमधून ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *