#INFORMATIV : ‘महिला बचत सन्मान योजना’; जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर माहिती

590 0

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना महिला आणि युवतींसाठी विशेष बचत योजना महिला सन्मान बचत योजनेची घोषणा केली. या योजनेत महिलांना अन्य लघु बचत योजना आणि बँकेच्या मुदत ठेवीच्या तुलनेत अधिक व्याजदर देण्याची तरतूद आहे. शिवाय सीनियर सिटिझनच्या बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढविली आहे. या नव्या योजनेमुळे सरकारकडे देशाच्या विकासासाठी अधिक पैसा उपलब्ध होईल अणि महिलांची आर्थिक सुरक्षा निश्चित करण्यास मदत मिळणार आहे.

महिला सन्मान बचत योजना
महिला सन्मान बचत योजना ही महिला आणि युवतींचे सक्षमीकरण लक्षात घेऊन सुरू केली आहे. या योजनेत कोणतिही वयस्कर भारतीय महिला कमाल दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. अर्थात ही गुंतवणूक दोन वर्षांसाठी असेल. सद्यस्थितीत ही योजना 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. पण आपत्कालिन स्थितीत या योजनेतून काही प्रमाणात पैसे काढण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. ही योजना कोणतिही सरकारी बँक अथवा पोस्ट ऑफिसमधून खरेदी करता येऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गुंतवणूकीवर प्राप्तीकर विभागाच्या कलम 80 सी नुसार सवलत आहे की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण यावर करसवलत मिळेल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.

व्याजदर आकारणी

महिला सन्मान बचत योंजनेच्या व्याजदराचे आकलन केल्यास या योजनेवर आकर्षक 7.5 टक्के व्याजदर देण्यात आले आहे. पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षाच्या टर्म डिपॉझिटवर केवळ 6.8 टक्के व्याज असून नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 7 टक्के, पीपीएफवर 7.1 टक्के आणि किसान विकास पत्र योजनेवर 7.2 टक्के व्याज आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर व्याजदर हा महिला सन्मान बचत योजनेवरील व्याजदरापेक्षा अधिक आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के दराने व्याज मिळते. सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीमवरचे व्याजदर 8 टक्के असून ते महिला सन्मान बचत योजनेवरील व्याजदरापेक्षा अधिक आहे.

मुदत ठेव की महिला सन्मान योजना

महिला सन्मान बचत सर्टिफिकेट स्कीमची बँकेच्या दोन वर्षाच्या मुदत ठेवीशी तुलना केली तर मुदत ठेवीवरील व्याजदर हे या योजनेच्या तुलनेत कमीच असल्याचे निदर्शनास येईल. बहुतांश बँक एक ते दोन वर्षाच्या मुदत ठेवीवर सात टक्के व्याज देत आहेत. याऐवजी महिलांसाठीची नवी योजना अधिक आकर्षक ठरू शकते. कमी कालावधीसाठी पैसा बाजूला काढून ठेवण्याची इच्छा बाळगणार्‍या महिला आणि युवतींना ही योजना फायदेशीर आहे.

ज्येष्ठांकडून अधिक बचत होणार

ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम देखील आकर्षक करण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा वाढविण्यात आली असून ती दुप्पट करण्यात आली आहे. पूर्वी सीनियर सिटिझन बचत योजनेत पंधरा लाख रुपये गुंतवणूकीची मर्यादा होती आणि ती आता 30 लाख रुपये करण्यात आली. सध्याच्या आर्थिक वर्षात व्याजदर 8 टक्के आहे. व्याजाचे आकलन तिमाहीच्या आधारावर होते आणि त्यानंतर त्याचे व्याज बचत खात्यात जमा होंते. या योजनेतून 80 सी नुसार कर सवलत मिळते. 60 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्ती हे बचत खाते सुरू करू शकते. तसेच 55 पेक्षा अधिक वयोगटातील निवृत्त सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि 50 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील निवृत्त सैनिकी कर्मचारी हे साठी गाठण्याअगोदर बचत खाते सुरू करू शकतात.

एमआयएसमध्ये गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ

पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढविण्यात आली आहे. पूर्वी या खात्यात एक व्यक्ती कमाल 4.50 लाख रुपये जमा करू शकत होता. पती आणि पत्नी वेगवेगळी गुंतवणूक करत असतील तर कमाल गुंतवणूक ही नऊ लाखांपर्यंत होती. आता या गुंतवणुकीची कमाल मर्यादा साडे चार लाखावरून नऊ लाख केली. म्हणजे आता पती आणि पत्नी वेगवेगळी गुंतवणूक करत असतील तर त्यांना कमाल 18 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येणे शक्य आहे. याशिवाय पती आणि पत्नी वेगवेगळी गुंतवीणूक करत नसतील परंतु संयुक्त गुंतवणूक करत असतील तर त्याची मर्यादा देखील नऊ लाखांवरून पंधरा लाख केल. या योजनेवर आजही 7.1 टक्के व्याजआकारणी आहे.
विविध सरकारी योजनांचे व्याजदर

योजना………..व्याजदर (टक्क्यांत)
एससीएसएस…….8
एसएसवाय…….7.60
महिला सन्मान बचत योजना….7.50
केव्हीपी………7.20
एमआयएस…….7.10
पीपीएफ……..7.10
एनएससी…….7
टर्म डिपॉझिट…..6.80

Share This News

Related Post

लंपी नियंत्रणासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक

Posted by - September 19, 2022 0
पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण…
Sharad Pawar

Sharad Pawar : बैठकीत भावूक झालेल्या ‘त्या’ नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादमध्ये

Posted by - June 7, 2023 0
जाफराबाद : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) अनुषंगाने सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जाफराबादच्या…

IPS अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारला राज्य कारागृह प्रमुख पदाचा पदभार

Posted by - December 18, 2022 0
पुणे : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त यांनी आज सकाळी राज्य कारागृहप्रमुख पदाचा पदभार अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्याकडून स्वीकारला…

उपोषण करून सरकारला जाब विचारणाऱ्या अण्णांच्या विरोधात आता आंदोलन !

Posted by - May 19, 2022 0
राळेगणसिद्धी- आंदोलन, उपोषणा करून सरकारला जाब विचारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मागील काही दिवसांपासून शांत बसलेले पाहायला मिळत आहेत. देशात…

“महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड”

Posted by - December 9, 2022 0
पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठी विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *